कोल्हापूर : रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवा, वाहतूक नियंत्रण शाखेवर रिक्षाचालकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:40 AM2018-12-03T11:40:45+5:302018-12-03T11:42:22+5:30

ग्रामीण भागातील सहा आसनी रिक्षांना शहरात येण्यास मुभा द्यावी, त्यांच्यावर कारवाई करू नये, या मागणीसाठी  रिक्षाचालक संघटनेने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मनसेचे राजू जाधव यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करीत निवेदन दिले.

Kolhapur: Stop rickshaw pullers, rickshaw pullers on traffic control branch | कोल्हापूर : रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवा, वाहतूक नियंत्रण शाखेवर रिक्षाचालकांचा मोर्चा

कोल्हापूर : रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवा, वाहतूक नियंत्रण शाखेवर रिक्षाचालकांचा मोर्चा

Next
ठळक मुद्दे रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवावाहतूक नियंत्रण शाखेवर रिक्षाचालकांचा मोर्चा

कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहा आसनी रिक्षांना शहरात येण्यास मुभा द्यावी, त्यांच्यावर कारवाई करू नये, या मागणीसाठी  रिक्षाचालक संघटनेने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मनसेचे राजू जाधव यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करीत निवेदन दिले.

शहरात सहा आसनी रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा होतो; म्हणून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षांवर खटले भरून ते प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले जात आहेत. ५ ते १२ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे.

पोलिसांच्या या कारवाईच्या भीतीने रिक्षाचालक सुरेश पंदारे बेशुद्ध पडले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी शहरातील रिक्षाचालकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोरे यांच्याशी चर्चा केली. पोरे यांनी आज, सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक व रिक्षाचालक निघून गेले.
 

 

Web Title: Kolhapur: Stop rickshaw pullers, rickshaw pullers on traffic control branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.