कोल्हापूर : गौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 04:30 PM2018-11-13T16:30:37+5:302018-11-13T16:34:48+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मंगळवारी येथे दिला.

Kolhapur: Strong action against mining miners illegal mining: Additional Collector | कोल्हापूर : गौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

कोल्हापूर : गौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देगौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईअप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांचा इशारा

 कोल्हापूर : जिल्ह्यात होणाऱ्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मंगळवारी येथे दिला.

जिल्ह्यामध्ये होत असलेल्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत नागरिकांना तक्रार नोंदविण्याकरिता खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये मुरुम, माती, दगड व वाळू, आदी गौण खनिजांचे विनापरवाना उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यावर तत्काळ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. त्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयामार्फत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Kolhapur: Strong action against mining miners illegal mining: Additional Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.