कोल्हापूर  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आदर्शवत करणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:35 PM2018-06-26T18:35:53+5:302018-06-26T18:40:02+5:30

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात विकसित करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. हे वसतिगृह आदर्शवत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले.

Kolhapur: Students of Maratha community will be idealized as hostels: Chandrakant Patil | कोल्हापूर  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आदर्शवत करणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सदर बाजार येथे सुरू होणाऱ्या  वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. यावेळी शेजारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देमराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आदर्शवत करणार : चंद्रकांत पाटीलवसतिगृहाची २६ जुलैला सुरुवात

कोल्हापूर  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात विकसित करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. हे वसतिगृह आदर्शवत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले.

सदर बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान इमारतीची दुरूस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली आहे. मराठा समाजातील ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहामध्ये होणार आहे. त्या वसतिगृह इमारतीची पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. याठिकाणी दि. २६ जुलैपर्यंत मुले प्रत्यक्ष राहण्यास येतील, ते  म्हणाले.


या वसतिगृहाच्या पाहणीवेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, उद्योगपती चंद्रकांत जाधव, सुरेश पाटील, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, शिरीष जाधव, आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या नव्याने विकसित केलेल्या वसतिगृह इमारतीची माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले.

अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत कर्जासाठीच्या अर्जदारांना बँका प्रतिसाद देत नाही. या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिलीप पाटील यांनी यावेळी दिला.

पालकमंत्री पाटील म्हणाले

  1. या वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे नावनोंदणी करावी.
  2. या वसतिगृहाच्या तळमजल्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष केंद्र विकसित करणार
  3.  या परिसरातील दुरवस्था झालेल्या अन्य निवासस्थानांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावा.

 

 

Web Title: Kolhapur: Students of Maratha community will be idealized as hostels: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.