कोल्हापूर : मुंबईच्या प्रवासाची सॅक चोरीस ; ३२ हजाराचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:08 PM2018-09-17T13:08:42+5:302018-09-17T13:10:38+5:30
अरनाळा ते कोल्हापूर शिवशाही बसने प्रवास करत असताना सॅक व त्यामधील लॅपटॉप, एटीएम, चार्जर व ३०० रुपये असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबत शिवकुमार अनिल कदम (वय २७,रा. लक्ष्मी नारायण बंगला, माळी कॉलनी, कोल्हापूर ) यांनी शाहूपुरी पोलिसात रविवारी दिली.
कोल्हापूर : अरनाळा ते कोल्हापूर शिवशाही बसने प्रवास करत असताना सॅक व त्यामधील लॅपटॉप, एटीएम, चार्जर व ३०० रुपये असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
ही घटना १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबत शिवकुमार अनिल कदम (वय २७,रा. लक्ष्मी नारायण बंगला, माळी कॉलनी, कोल्हापूर ) यांनी शाहूपुरी पोलिसात रविवारी दिली.
पोलिसांनी सांगितले की, अनिल कदम हे सध्या मुंबई-बोरीवली (पश्चिम) येथील गौराई येथे राहतात. ते १२ सप्टेंबरला अरनाळा ते कोल्हापूर या शिवशाही बसमध्ये बसले.
प्रवासादरम्यान त्यांची सॅक कोणीतरी चोरुन नेली व हा प्रकार त्यांच्या कोल्हापूरात आल्यावर लक्षात आला. त्यानंतर रविवारी कदम यांनी याबाबत फिर्याद दिली.
कामानिमित्त ते कोल्हापूरात आले होते. लॅपटॉप, टीमर मशीन, पाकिटातील ३०० रुपये, पॅनकार्ड, दोन ए.टी.एम. व लॅपटॉप चार्जर असा सुमारे ३२ हजारांचा माल चोरुन नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.