कोल्हापूर : ‘एमपीएससी’मध्ये सुुधीर पाटील, ऐश्वर्या गिरी, श्रीधर पाटील यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:06 PM2018-05-31T15:06:02+5:302018-05-31T15:06:02+5:30
विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये कोल्हापुरातील उमेदवारांनी धवल यश मिळविले. नांदणी (ता. शिरोळ) येथील सुधीर सुभाष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
कोल्हापूर : विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये कोल्हापुरातील उमेदवारांनी धवल यश मिळविले. नांदणी (ता. शिरोळ) येथील सुधीर सुभाष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
शिवाजी पेठ येथे राहणाऱ्या ऐश्वर्या आनंद गिरी यांनी तहसीलदार पदाच्या परीक्षेत महिला प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील श्रीधर बाजीराव पाटील यांनी राज्यात पाचवा क्रमांक मिळविला.
‘एमपीएससी’तर्फे बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला. कळे (ता. पन्हाळा) येथील राजश्री संपतराव देसाई यांनी चीफ आॅफिसर (नगरपरिषद) पदाच्या परीक्षेत यश मिळविले. कपिलेश्वर (ता. राधानगरी) मधील समरजित बळवंत पाटील यांनी डेप्युटी एज्युकेशन आॅफिसर पदाच्या परीक्षेमध्ये राज्यात सहावा क्रमांक मिळविला.
त्यांच्यासह सांगली जिल्ह्यातील शीतल बंडगर यांनी तहसीलदार परीक्षेत महिला प्रवर्गामध्ये राज्यात प्रथम, साताऱ्याच्या शंकर खांडरे यांनी चीफ आॅफिसर (नगरपरिषद) पदाच्या परीक्षेत एस. सी. प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने यश मिळविले.
सोनके (ता. पंढरपूर) येथील जयश्री चंदनशिवे या फायनान्स अॅण्ड अकौंटंट आॅफिसर पदाच्या परीक्षेत एस.सी. महिला प्रवर्गामधून राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत सुधीर पाटील वगळता अन्य पदांच्या परीक्षेतील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमधील यशस्वी झालेले उमेदवार हे कोल्हापुरातील ए. बी. फौंडेशनचे विद्यार्थी आहेत. त्यांना दीपक अतिग्रे, ज्ञानदेव भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले.