कोल्हापूर : सीपीआरच्या प्रसूतिगृहाला विविध संघटनांचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:20 PM2018-05-16T13:20:22+5:302018-05-16T13:20:22+5:30
छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाच्या (सीपीआर) प्रसूतिगृहाला विविध संघटनांनी मदतीचा हात दिला. या संघटनांनी बेड, कचराकुंडी आदी साहित्य या विभागाला देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाच्या (सीपीआर) प्रसूतिगृहाला विविध संघटनांनी मदतीचा हात दिला. या संघटनांनी बेड, कचराकुंडी आदी साहित्य या विभागाला देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
या प्रसूतिगृहामध्ये २५ बेड आणि गाद्या, ५० कचराकुंड्यांची गरज आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले. त्यातील पहिले पाऊल म्हणून रूईकर कॉलनीतील ‘आर के ग्रुप’च्या रोहित कोलवालकर यांनी दहा कचरा कुंड्या आणि आठशे सॅनिटरी नॅपकिन दिले.
त्यासह सीपीआरमध्ये ठिकठिकाणी त्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगणारे आणि याबाबत जनजागृतीचे फलक लावले. या उपक्रमात लहान आणि तरूण मुले सहभागी झाले. हृदयस्पर्श ग्रुपचे सदस्य रामेश्वर पत्की यांनी कचराकुंड्यांची भेट दिली.
शैलेश पाटील सडोलीकर यांनी मातृदिनाचे औचित्यसाधून आई गीतांजली यांच्या स्मरणार्थ सीपीआरला सर्वसोईनी युक्त बेडची भेट दिली. या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची मदत ‘सीपीआर’चे वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, प्रभारी विभाग प्रमुख स्त्री रोग व प्रसुतीविभाग डॉ. जोत्स्ना देशमुख यांच्या सुर्पूद केली.
यावेळी समाजसेवा अधीक्षक उज्वला सावंत, जयवंत कदम, आदी उपस्थित होते. हेल्पिंग हँन्डस् फौडेशनच्या कोल्हापूर शाखेतर्फे गीता हसूरकर, ज्योती जाधव ,मंगला नियोगी , साईशा हसूरकर अमित भोसले, सुचेत हिरेमठ, अमोल घोरपडे, रोहीत सवाईराम, महेश सूर्यवंशी, सारंग तेरदाळकर, प्रथमेश ढोले, प्रणव पवार, सुरज देसाई यांनी मदत केली.