कोल्हापूर : चव्हाण दाम्पत्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ उपोषण, खोटा गुन्हा दाखल करण्याऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:14 PM2018-01-25T18:14:16+5:302018-01-25T18:22:05+5:30
राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यामधील आरोपींशी हातमिळवणी करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सुधाकरनगर येथील अॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र (रा. एस-५, सारंग अपार्टमेंट) या दाम्पत्याने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाजवळ उपोषण केले.
कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यामधील आरोपींशी हातमिळवणी करून आमच्यावर केला. गुन्ह्याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सुधाकरनगर येथील अॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र (रा. एस-५, सारंग अपार्टमेंट) या दाम्पत्याने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाजवळ उपोषण केले.
यापूर्वी याबाबतचे निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना देण्यात आले होते. चव्हाण यांच्यावर झालेल्या अन्यायाची चौकशी व्हावी, अशा सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या होत्या; पण त्याबद्दल पुढे काहीही झाले नाही; म्हणून मी उपोषणाला बसले असल्याचे चारूलता चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राजारामपुरी पोलिसांत एका गुन्ह्यात आरोपींवर कारवाईऐवजी त्यांच्याशी हातमिळवणी केली. हा तपास थांबवून कागदपत्रांमध्ये हवा तसा बदल करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच खऱ्या गुन्ह्यातील पुरावा नष्ट करून खोटा पुरावा गोळा करण्यासाठी संबंधित अधिकारी आमच्या घरात बेकायदेशीररीत्या घुसले व त्यांनी मुलास मारहाण केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा. याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८१/२०१७ अशी पोलीस दप्तरी नोंद आहे.
याचबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांचे पैसे मला तत्काळ परत मिळण्याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातून आदेश होऊनही जाणीवपूर्वक पोलीस अधीक्षक, कोल्हापूर कार्यालयाकडून पैसे मिळालेले नाहीत. सात वर्षे होऊनही मला न्याय मिळालेला नाही. तरी या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अॅड. चारूलता चव्हाण यांनी सांगितले.
राजारामपुरी पोलिसांत खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सुधाकरनगर येथील अॅड. चारूलता चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र चव्हाण हे दाम्पत्य गुरुवारी ताराबाई पार्कातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ आमरण उपोषणास बसले होते.