कोल्हापूर : शिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परत, शाळा कृती समितीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:58 PM2018-03-12T17:58:33+5:302018-03-12T18:08:21+5:30
कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.
कोल्हापूर : कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.
विना अनुदानित शाळांमध्ये अनेक शिक्षक गेली अठरा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर आणि काही ठिकाणी विना वेतन काम करत आहेत. या विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.
याची दखल घेवून काही शाळांचे मूल्यांकन करून १४६ शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या. ज्या शाळा अनुदानासाठी घोषित केल्या आहेत त्या शाळांच्या अनुदानाबाबत अद्याप कोणताच निर्णय दिला नाही. याबाबत पाठपुरावा करून सुध्दा शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
मात्र दहावी - बारावीची परीक्षेवेळी मात्र शासनाला आमच्या शिक्षकांची आठवण येते. त्यामुळे या विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्ड परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उत्तरपत्रिकांची प्रतिकात्मक होळी करून शासनाचा निषेध नोंदवला होता. तरीही बोर्डाने या शिक्षकाकडे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासनीस पाठवली आहे.
या निषेध म्हणून शिक्षकांनी एसएससी बोर्डासमोर उत्तरपत्रिका परत करून तीव्र निषेध केला. यावेळी या शिक्षकांनी शासनाच्या विरोध घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला.
यावेळी बाजीराव बरगे, किरण पाटील, रामचंद्र खुडे, सागर पाटील, पल्लवी सुतार, जयश्री कांबळे, पूजा शिंगे, मीनाक्षी स्वामी, पल्लवी कांबळे, दिपाली चौगले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शिक्षक सहभागी झाले होते.
तीव्र निषेध....
अनुदान मिळावे या मागणीसाठी संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी २१० वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. या शिक्षकांना स्वत:चा चरितार्थ चालवण्यासाठी शेतमूजरी, रिक्षा चालवणे अन्य कामे करावी लागत आहेत. मात्र शासन कोणतीही दखल घेत नाही, फक्त दहावी - बारावी परीक्षेला आमच्याकडे लक्ष देत्या. त्यामुळे शासनला जाग आणण्यासाठी शिक्षकांनी खांद्यावर पेपर गठ्ठे घेवून शासनाचा विरोधात भर उन्हात तीव्र निषेध केला.
कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन केले आहे. आमच्या शिक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन सुमारे १५ हजार उत्तरपत्रिका बोर्डाला आज परत केल्या. पगार न मिळाल्याने शिक्षक वैफल्यग्रस्थ झाले आहेत. उत्तरपत्रिकांबाबत कोणतेही गैरकृत्य झाल्यास याला सर्वस्वी शासनच जबाबदार राहील.
- रत्नाकर माळी
- - भर उन्हात शिक्षकांचे आंदोलन
- - पेपर गठ्ठे खांद्यावर घेत केला निषेध
- - पंधरा हजार पेपर परत केले.