राज्य निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ सुपरलिगसाठी पात्र
By सचिन भोसले | Published: December 22, 2023 08:01 PM2023-12-22T20:01:11+5:302023-12-22T20:01:51+5:30
एक डाव ८३ धावांनी स्टार क्रिकेट क्लब(पुणे) चा पराभव केला : राजदीप मंडलिकची चमकदार कामगिरी
सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित चौदा वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने स्टार क्रिकेट क्लब (पुणे) चा एक डाव व ८३ धावांनी पराभव केला. या विजयामुळे संघ सूपरलीगसाठी पात्र ठरला.
शासकीय तंत्रनिकेतन काॅलेज मैदानावर झालेल्या या सामन्यात कोल्हापूर संघाने पहिल्या डावात ६०.३ षटकांत सर्वबाद १८९ धावा केल्या. यात राजदीप मंडलिक ५३, आयुष चाळके २१, आर्यन कित्तुरे २०, शौर्य कोरोचीकर व विरेन पाटील यांनी प्रत्येक १त६ धावा केल्या. गोलंंदाजी करताना स्टार संघाकडून अर्जुन डोंगरेने ६, ऋषभ कुलकर्णीने तीन आणि आरव नानाने १ बळी घेतला. उत्तरादाखल पहिल्या डावात स्टार संघ ४८ षटकांत सर्वबाद ७७ धावांत गुंडाळला.यात शौर्य तुपेने १८, ऋषभ कुलकर्णीने १६, भुजंग धुळगुडेने १४ धावांचे योगदान दिले. कोल्हापूरकडून राजदीप मंडलिकने भेदक गोलंदाजी करीत चार, तर सौरभ सेनीने व वेदांत पाटील यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्यात स्टार संघाचा दुसरा डाव २२.५ षटकांत सर्वबाद २९ धावांत गुंडाळला. यात सर्वाधिक धावा रोहन सरबतेने १३ धावांचे योगदान दिले. तर कोल्हापूर संघाकडून दुसऱ्या डावातही भेदक गोलंदाजी करीत राजदीप मंडलिकने ४, तर सौरभ सैनीने ३ आणि वेदांत पाटीलने २ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब करीत सुपरलीगसाठी पात्र होण्याची कामगिरी केली.
विजयी संघात आर्यन कित्तुरे(कर्णधार), अर्जुन घोरपडे, अवनिश आंग्रे, आयुष चाळके, ओम डी.पाटील, राजदीप मंडलीक, सौरभ सैनी, शिवजीत इंदुलकर, शौर्य कोरोचीकर, वेंदात पाटील, विरेन पाटील, यश पाटील, अथर्व ओतारी, प्रशिक्षक युवराज पाटील यांचा समावेश आहे.