कोल्हापूरच्या संघाची बाजी -मुरगूड फुटबॉल स्पर्धा : रवी शिंदे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:39 AM2019-06-18T01:39:04+5:302019-06-18T01:39:42+5:30

मुरगूड (ता. कागल) येथील तुकाराम चौक यांच्यावतीने सत्यजित पाटील (आबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने बाजी मारली. रवी शिंदे फुटबॉल संघाने पेनल्टी शुटआऊटवर

Kolhapur team's wager - Murgud Football tournament: Ravi Shinde Sangh first-ranked honorary | कोल्हापूरच्या संघाची बाजी -मुरगूड फुटबॉल स्पर्धा : रवी शिंदे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

येथील फुटबॉल स्पर्धत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना कोल्हापूरच्या रवी शिंदे फुटबॉल संघाचे खेळाडू.

Next

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील तुकाराम चौक यांच्यावतीने सत्यजित पाटील (आबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने बाजी मारली. रवी शिंदे फुटबॉल संघाने पेनल्टी शुटआऊटवर जय गणेशचा ४-३ अशा गोल फरकाने पराभव करीत अजिक्यंपद पटकावले. तर मॅन आॅफ द टुनार्मेंटचा मान आदित्य रोटे (जय गणेश) याने मिळविला.

तुकाराम चौक यांच्यावतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेत दहा संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम - रवी शिंदे फुटबॉल संघ, कोल्हापूर, द्वितीय - जय गणेश, गडहिंग्लज, तृतीय (विभागून) - लाल आखाडा मुरगूड व युनायटेड, गडहिलंज स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे अशी : मॅन आॅफ द टुनार्मेंट - आदित्य रोटे ( जय गणेश), बेस्ट गोलकीपर - निखिल खाडे ( शिंदे फुटबॉल ), बेस्ट स्ट्रायकर - अक्षय होडगे (जय गणेश), बेस्ट मिडफिल्डर - ऋतुराज पाटील (लाल आखाडा), बेस्ट डिफेन्डर - आरबाज पेंढारी (शिंदे फुटबॉल), मुख्य पंच म्हणून अनिल शिकलगार (मिरज) यांनी, तर प्रकाश लोहार, ओंकार रामाणे, सुयश राउत यांनी लाईन पंच म्हणून काम पाहिले.

स्पधेचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या हस्ते, तर रणजित सूर्यवंशी, राजू आमते यांच्या उपस्थितीत झाले. बक्षीस समारंभास युवा नेते समरजित मंडलिक, उद्योगपती अमर पवार, उद्योगपती शुभम भोईटे, विक्रम पवार, रवींद्र पाटील, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सुखदेव पाटील, सत्यजित पाटील, दिग्विजय पाटील, दत्तात्रय मंडलिक, नगरसेवक राहुल वंडकर, नगरसेवक मारुती कांबळे, नामदेव भांदिगरे, राजू चव्हाण, जगन्नाथ पुजारी, श्रीनिवास पाटील, अमर देवळे, राजू आमते, संजय मोरबाळे, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजितदादा पाटील होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाधान पोवार, प्रकाश लोहार, बबन बाबर, सिद्धी पोतदार, पप्पू कोळी, पांडूरंग पुजारी, गणेश तोडकर, प्रवीण मांगोरे, राजेश गोधडे यांच्यासह एसपी स्पोर्टस्ने परिश्रम घेतले. स्वागत बबन बाबर यांनी, प्रास्ताविक प्रकाश लोहार यांनी तर सूत्रसंचालन व आभार समाधान पोवार यांनी मानले.

 

Web Title: Kolhapur team's wager - Murgud Football tournament: Ravi Shinde Sangh first-ranked honorary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.