कोल्हापुरात ३ एप्रिल रोजी प्रादेशिक सेना भरती

By admin | Published: March 19, 2017 02:58 PM2017-03-19T14:58:39+5:302017-03-19T14:58:39+5:30

५६ जागांसाठी भरती; सात दिवस चालणार मेळावा

In the Kolhapur Territorial Army recruitment on April 3 | कोल्हापुरात ३ एप्रिल रोजी प्रादेशिक सेना भरती

कोल्हापुरात ३ एप्रिल रोजी प्रादेशिक सेना भरती

Next

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ : कोल्हापूर येथील मिलिटरी प्रशिक्षण मैदान येथे प्रादेशिक सेनेत शिपाई व लिपिक या २९ पदांसाठी निवड चाचणी मेळावा ३ ते ९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे. एकूण ५६ पदांसाठी ही भरती होणार आहे,अशी माहिती १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामध्ये शिपाई (जनरल ड्यूटी), लिपिक, ट्रेडसमेन (मसालची), (कुक), (लोहार), (सफाईवाला) ही पदे आहेत. या मेळाव्यात १८ ते ४२ वर्षांपर्यंतचे उमेदवार भरतीत भाग घेऊ शकतात़ दररोज सकाळी सहा वाजता भरतीसाठी उमेदवारांनी हजर राहावे. सकाळी सातनंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

अशी आहेत पदे
शिपाई (जनरल ड्यूटी), एकूण जागा : ४८, शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास (४५ टक्के गुण आवश्यक), राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडूंना प्राधान्य, टेक्निकल एज्युकेशन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. लिपिक, रिक्त जागा : ०३, शैक्षणिक पात्रता : किमान बारावी पास, राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडंूना प्राधान्य. टंकलेखन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. ट्रेडसमेन (मसालची)रिक्त जागा : १, शैक्षणिक पात्रता ८ वी पास, ट्रेडसमेन (कुक) रिक्त जागा : २, (लोहार) रिक्त जागा : १, (सफाईवाला) रिक्त जागा :१ सर्व साठी शैक्षणिक पात्रता : दहावी पास

Web Title: In the Kolhapur Territorial Army recruitment on April 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.