कोल्हापुरात मानाच्या ‘तुकाराम माळी तालीम’च्या गणेशपुजनाने मिरवणूकीस प्रारंभ

By सचिन भोसले | Published: September 9, 2022 09:40 AM2022-09-09T09:40:57+5:302022-09-09T09:41:44+5:30

कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘ श्री’ चे पालखी पूजन व आरतीने शाहू छत्रपती व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते खासबाग मैदान येथे झाला.

Kolhapur the procession started with Ganesh Pujan of Tukaram Mali Taleem ganpati | कोल्हापुरात मानाच्या ‘तुकाराम माळी तालीम’च्या गणेशपुजनाने मिरवणूकीस प्रारंभ

कोल्हापुरात मानाच्या ‘तुकाराम माळी तालीम’च्या गणेशपुजनाने मिरवणूकीस प्रारंभ

googlenewsNext

कोल्हापूर :

कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘ श्री’ चे पालखी पूजन व आरतीने शाहू छत्रपती व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते खासबाग मैदान येथे झाला.

यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया कोल्हापूर महानगर पालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिवसेना जिल्हा प्रमुख,विजय देवणे, माजी महापौर आर.के.पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार, लाला गायकवाड, माजी नगरसेवक आदील फरास, , पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, ,आदी उपस्थित होते.  प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने परिसर दणाणून सोडला. फुलांनी सजविलेल्या पालखीचे शाहू छत्रपती व  माजी पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील आदी मान्यवरांनी सारथ्य करत ही पालखी मिरजकर तिकटीपर्यंत वाहून नेली. यावेळी मिरजकर तिकटी येथे तुकाराम माळी तालीम मंडळाने देखाव्यात सादर केलेल्या मला ग्रामीण व शहर विकासासाठी हद्द वाढ हवी या बुलेट स्वार गणपती एका व्याज मान्यवरांनी हिरवा कंदील दाखवा

रस्ते बंदचा फटका माजी मंत्र्यानाही
गणेश उत्सवांनामुळे मिरवणूक मार्गावर येणारे रस्ते पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत त्याचा फटका माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना बसला त्यांना तीन वेळा रस्ता बदलावा लागला.

Web Title: Kolhapur the procession started with Ganesh Pujan of Tukaram Mali Taleem ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.