कोल्हापूर : वन अधिकाऱ्याच्या घरात अडीच लाखाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 03:38 PM2018-08-24T15:38:59+5:302018-08-24T15:41:43+5:30
न्यु पॅलेस रोड पाटोळे मळा येथील वनअधिकारी यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून नऊ तोळे सोने व चांदीचे दागिने, ४० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला.
कोल्हापूर : न्यु पॅलेस रोड पाटोळे मळा येथील वनअधिकारी यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून नऊ तोळे सोने व चांदीचे दागिने, ४० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दूपारी उघडकीस आली.याबाबत विजय राजाराम खेडकर (वय ३८, रा. पाटोळे मळा, प्लॉट नंब र ८४/१) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली.
पोलिसांनी सांगितले की, विजय खेडकर हे वन्यजीव, कोल्हापूर येथे विभागीय वनअधिकारी आहेत. ते पत्नी कांचन, मुलगा सोहम व मुलगी मृणाल असे एकत्रित घरमालक अतुल अनिल पाटोळे यांच्या घरात एका वर्षापासून ते राहतात. गुरुवारी कांचन खेडकर या न्यु पॅलेस येथे मुलानां शाळेतून आणण्याकरिता घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्या शाळेतून घरी आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे त्यांना निदर्शनास आले.
त्या खोलीमध्ये आत गेल्या. त्याठिकाणी लोखंडी तिजोरीचे लॉकरचे लॉक तिथेच असलेल्या चावीने उघडलेले तसेच तिजोरीतील बँकेचे चेकबुक, पासबुक व इतर साहित्य विस्कटल्याचे दिसले. हा प्रकार त्यांनी पती विजय खेडकर यांना सांगितला. याबाबतचा प्रकार खेडकर यांनी पोलिसांना कळविला. त्यानूसार पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
चार तोळ्याचे सोन्याचे एक गंठण, दोन तोळ्याचे सोन्याचे एक गंठण, एक तोळ्याचे कानातील टॉप्स, सोन्याची चेन, अर्ध्या तोळ्याची चेन, तीन चांदीचे कॉईन, चांदीची तीन पैंजणे व ४० हजार रुपये असा सुमारे दोन लाख ५२ हजार रुपयांचा माल चोरट्याने नेला.