कोल्हापूर : दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:27 PM2018-10-29T13:27:11+5:302018-10-29T13:28:56+5:30

रेशनच्या ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील सुमारे साडेपाच लाख रेशन ग्राहकांसाठी साखर जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. उडीद व हरभरा डाळ दोन दिवसांत येणार असून, १ नोव्हेंबरपासून त्यांचे वाटप सुरू होणार आहे.

Kolhapur: There has been a ration of sugar for Diwali, gram flour in two days, Udiddal may also come in two days | कोल्हापूर : दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार

कोल्हापूर : दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार

Next
ठळक मुद्दे दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार१ नोव्हेंबरपासून वाटप : लोकमत इफेक्ट

कोल्हापूर : रेशनच्या ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील सुमारे साडेपाच लाख रेशन ग्राहकांसाठी साखर जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. उडीद व हरभरा डाळ दोन दिवसांत येणार असून, १ नोव्हेंबरपासून त्यांचे वाटप सुरू होणार आहे.

रेशन दुकानदारांनी विक्रीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या संख्येत वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यासाठी वारंवार पाठपुरावाही सुरू आहे. ग्राहकांनाही या वस्तू बाजारभावापेक्षा कमी व माफक दरात मिळाव्यात व रेशन दुकानदारांनाही चार पैसे जादा मिळावेत, हा यामागील उद्देश आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने साखर, हरभराडाळ व उडीदडाळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे रेशन दुकानदारांसह ग्राहकांचीही दिवाळी गोड आणि खुसखुशीत होणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे साखर प्राप्त झाली आहे; तर दोन दिवसांत उडीद व हरभराडाळ प्राप्त होणार आहे. प्रतिकार्ड १ किलो याप्रमाणे याचे १ नोव्हेंबरपासून वाटप होणार आहे. २० रुपये प्रतिकिलोने साखर, ३५ रुपये किलोने हरभराडाळ व ४४ रुपये किलोने उडीदडाळ शासनाने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

‘लोकमत’ इफेक्ट!

‘लोकमत’मधून ‘रेशन ग्राहकांचा दिवाळीचा फराळ होणार गोड’ अशा आशयाचे वृत्त ५ आॅक्टोबरला प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी याबाबतचा शासन निर्णय घेतला व साखर, हरभराडाळ व उडीदडाळ प्रतिकार्ड एक किलोप्रमाणे उपलब्ध करून दिली आहे.
 

 

Web Title: Kolhapur: There has been a ration of sugar for Diwali, gram flour in two days, Udiddal may also come in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.