कोल्हापूर : जयंती नदीमध्ये प्राणवायूच नाही, तपासणीचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 04:43 PM2018-12-08T16:43:28+5:302018-12-08T16:46:35+5:30

जयंती नदीतील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार या पाण्यामध्ये मासे किंवा इतर जलचरांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायूच नसल्याचे स्पष्ट झाले.

Kolhapur: There is no oxygen in the river Jayanti, the conclusion of the investigation | कोल्हापूर : जयंती नदीमध्ये प्राणवायूच नाही, तपासणीचा निष्कर्ष

 कोल्हापुरात असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सच्या वतीने तज्ज्ञांसोबत जयंती व गोमती नद्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ विनोद बोधनकर आणि ओमकार गानू यांनी पाण्याची तपासणी केली. शेजारी राजेंद्र सावंत, विजय चोपदार, प्रशांत काटे, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजयंती नदीमध्ये प्राणवायूच नाही, तपासणीचा निष्कर्ष‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस’च्या वतीने तज्ज्ञांकडून पाहणी

कोल्हापूर : असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सच्या वतीने तज्ज्ञांसोबत जयंती नदी (नाला) आणि गोमती नदीची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये जयंती नदीतील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. या पाण्यातील प्राणवायूची मात्रा तपासण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार या पाण्यामध्ये मासे किंवा इतर जलचरांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायूच नसल्याचे स्पष्ट झाले.

पुणे येथील पर्यावरणतज्ज्ञ विनोद बोधनकर, जयप्रकाश पराडकर, नीलेश इनामदार, ओमकार गानू यांनी पाण्याची तपासणी केली. हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर परिसरातील जयंती नदीचा अभ्यास सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये करण्यात आला.

या वेळी झालेल्या पाहणीच्या निष्कर्षांनंतर पर्यावरणतज्ज्ञ विनोद बोधनकर यांनी सांगितले की, या नाल्यातील पाण्यामध्ये प्राणवायूच शिल्लक नसल्यामुळे कोणतेही जलचर प्राणी जगू शकत नाहीत. या भागातील लोकांकडून प्रदूषणाचे हे घटक पाण्यापर्यंत जाऊ नयेत यासाठी लोकजागृती करणे आवश्यक आहे.

दरम्यान, या पाहणीपूर्वी असोसिएशनच्या कार्यालयामध्ये ‘घनकचरा निर्मूलन व्यवस्थापन’ या विषयावर वरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये पर्यावरणतज्ज्ञ बोधनकर यांनी घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘सागर मित्र’ संघटनेची माहिती दिली.

अभ्यासक जयप्रकाश पराडकर यांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाबद्दल मार्गदर्शन केले. नीलेश इनामदार यांनी ‘घनकचऱ्यापासून इंधननिर्मिती’विषयी माहिती सांगितली.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सेक्रेटरी राज डोंगळे, माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, अनिल घाटगे, उमेश कुंभार, प्रशांत काटे, प्रमोद पोवार, विजय आर. पाटील, निशांत पाटील, सचिन घाटगे, अतुल दिघे, विनायक दिवाण, सुभाष यादव, आदी उपस्थित होते.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे काम

पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आमच्या असोसिएशनचे काम सुरू आहे.लोकसहभागाकरिता जनजागृतीला आम्ही प्राधान्य देणार आहोत. माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून यापूर्वी केलेल्या जयंती नदीच्या सर्व्हेक्षणाची माहिती दिली.


 

 

Web Title: Kolhapur: There is no oxygen in the river Jayanti, the conclusion of the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.