कोल्हापूर : प्रवेशाचे आमिष दाखवून शिक्षकाला साडेतीन लाखांचा गंडा, सांगलीच्या भामट्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:11 PM2018-09-07T16:11:15+5:302018-09-07T16:13:18+5:30
मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये मुलाला बारावीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सांगलीच्या भामट्याने शिक्षकाला सुमारे साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित भामटा मिलींद जनार्दन जोशी (रा. बिनीवाले विठ्ठल मंदीर, मारुती चौक, सांगली) याचेवर गुरुवारी (दि. ६) लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूर : मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये मुलाला बारावीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सांगलीच्या भामट्याने शिक्षकाला सुमारे साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित भामटा मिलींद जनार्दन जोशी (रा. बिनीवाले विठ्ठल मंदीर, मारुती चौक, सांगली) याचेवर गुरुवारी (दि. ६) लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी, फिर्यादी प्रतापराव जगन्नाथ खरात (वय ४९, रा. सूर्यवंशी कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) हे शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा वैभव हा शिक्षण घेत आहे. त्यांची संशयित मिलींद जोशी याचेशी पत्नीच्या माहेरकडून ओळख झाली होती.
यावेळी जोशी याने तुमच्या मुलग्याला मानव विकास कल्याण प्रतिष्ठान औरंगाबाद या संस्थेच्या डिफेन्स अरिअर अकॅडमीमध्ये बारावीसाठी प्रवेश मिळवून देतो, असे विश्वासाने सांगून २०१७ मध्ये त्यासाठी वेळोवेळी खरात यांचेकडून ३ लाख ६० हजार रुपये घेतले.
पैसे देवूनही प्रवेश न मिळाल्याने आपली फसवणूक झालेचे खरात यांचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी लक्ष्मीपूरी पोलीसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वसंत बाबर तपास करीत आहेत.
फसवणूक प्रकरणातील आरोपी सांगली येथील राहणारा आहे. गुन्हा दाखल झालेपासून त्याचा मोबाईल बंद आहे. त्याला अटक करण्यासाठी शुक्रवारी पथक सांगलीला रवाना केले आहे.
वसंत बाबर,
पोलीस निरीक्षक, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे