राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या शर्व, परी, युगरत्ना यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 02:27 PM2023-12-22T14:27:56+5:302023-12-22T14:28:14+5:30
कोल्हापूर : भोपाळ (मध्यप्रदेश) त २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी शर्व घुगरे, ...
कोल्हापूर : भोपाळ (मध्यप्रदेश) त २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी शर्व घुगरे, परी डोईफोडे, युगरत्ना शर्मा यांची निवड झाली. तिघेही वेध रायफल व पिस्तल ॲकॅडमीचे नेमबाज आहेत.
ही निवड कोल्हापूरात झालेल्या राज्यस्तरीय रायफल नेमबाजी स्पर्धेतून झाली. या स्पर्धेत १० मीटर ओपनसाईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षखालील गटात शर्व घुगरे याने ४०० पैकी ३४८ गुण िळून सुवर्णपदक मिळवले. तर त्याच प्रकारात १७ वर्षाखालील गटात परि डोईफोडे हिने ४०० पैकी ३५२ गुण मिळवत तिनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पीपसाईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षाखालील गटात युगरत्ना शर्मा हिने ३०० पैकी ३८९ गुण मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. या नेमबाजांना आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका हवालदार व रोहीत हवालदार , धैर्यशील देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.