कोल्हापूर : कपडे चोरी प्रकरणी पुण्याच्या तीन महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:08 PM2018-10-31T16:08:28+5:302018-10-31T16:10:49+5:30

महाद्वाररोड बालाजी भवन येथील कापड दूकानात कपडे खरेदीचा बहाणा करीत सहा हजार किंमतीचे चार ड्रेस चोरुन नेणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना जुनाराजवाडा पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेतले. संशयित मुमताज खासीम दरबेज (वय ४०), खासीमा बाहिम खान फकीर (४५), बानु खवाजा शेख (३०, सर्व रा. लष्कर बाबा जान चौक दर्गाजवळ, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

Kolhapur: Three women were arrested for theft of clothes in theft case | कोल्हापूर : कपडे चोरी प्रकरणी पुण्याच्या तीन महिला ताब्यात

कोल्हापूर : कपडे चोरी प्रकरणी पुण्याच्या तीन महिला ताब्यात

Next
ठळक मुद्देकपडे चोरी प्रकरणी पुण्याच्या तीन महिला ताब्यातसीसीटीव्ही फुटेजवरुन प्रकार उघडकीस

कोल्हापूर : महाद्वाररोड बालाजी भवन येथील कापड दूकानात कपडे खरेदीचा बहाणा करीत सहा हजार किंमतीचे चार ड्रेस चोरुन नेणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना जुनाराजवाडा पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेतले. संशयित मुमताज खासीम दरबेज (वय ४०), खासीमा बाहिम खान फकीर (४५), बानु खवाजा शेख (३०, सर्व रा. लष्कर बाबा जान चौक दर्गाजवळ, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, प्रतिक प्रशांत तोरस्कर (वय २६, रा. अंबाई टॅक, कोल्हापूर) यांचे महाद्वारोडवर कापड दूकान आहे. ३० आॅक्टोंबरला त्यांच्या दूकानात दूपारी दोनच्या सुमारास तिन महिला आल्या. त्यांनी दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्याचा बहाणा करीत चार ड्रेस चोरुन नेले.

तोरस्कर यांच्या लक्षात हा प्रकार आलेनंतर त्यांनी जुनाराजवाडा पोलीसांत फिर्याद दिली. पोलीसांनी दूकानातील सीसीटीव्ही फुटेजवरुन तिघा संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी आणखी कुठे चोरीचे गुन्हे केले आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Three women were arrested for theft of clothes in theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.