कोल्हापूर-तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा ३१ मार्च पासून पूर्ववत : महाडिक यांची गुड न्यूज

By संदीप आडनाईक | Published: March 10, 2024 01:17 PM2024-03-10T13:17:15+5:302024-03-10T13:17:28+5:30

कोल्हापूर विमानतळ टर्मिनल बिल्डिंगचे मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

Kolhapur-Tirupati closed flight service restored from March 31: Mahadik's good news | कोल्हापूर-तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा ३१ मार्च पासून पूर्ववत : महाडिक यांची गुड न्यूज

कोल्हापूर-तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा ३१ मार्च पासून पूर्ववत : महाडिक यांची गुड न्यूज

कोल्हापूर : कोल्हापूर-तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा ३१ मार्च पासून पूर्ववत सुरू होत असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केली. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने आझमगड येथून देशातील ३४ हजार कोटींच्या रेल्वे, महामार्ग आणि विमानतळ प्रकल्पांचे लोकार्पण आणि शीलान्यास केले.

महाडिक म्हणाले, वर्षभरात कोल्हापूरच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देऊ अशी घोषणा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर दोन दिवसात या विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव मिळेल असेही त्यांनी सांगितले. 

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम स्थळी ११.५५ वाजता आगमन झाले. त्यांना भाषणाला वेळ मिळाला नाही. तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार  खासदार धैर्यशिल माने, खासदार संजय मंडलिक यांची भाषणे झाली.

कोल्हापुरात विमानतळावर झालेल्या कार्यक्रमास विमानतळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी,  राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र यड्रावकर, समरजित घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Web Title: Kolhapur-Tirupati closed flight service restored from March 31: Mahadik's good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.