राष्ट्रीय पोषण अभियानात कोल्हापूर देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 08:23 PM2018-10-06T20:23:13+5:302018-10-06T20:27:42+5:30
केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून महाराष्ट्र देशात पहिले आले आहे.
राजश्री सयाजी साळसकर (अंगणवाडी सेविका माले, ता. पन्हाळा), शोभा महादेव लोहार (आशा), वैशाली भास्कर शितोळे (परिचर), स्मिता सदानंद चोपडे (पर्यवेक्षिका, केखले प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. पन्हाळा), संध्या उल्हास चांदणे (आरोग्य सहाय्यिका, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. कागल) या पाच महिला कर्मचारी वैयक्तिक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
देशभर सप्टेंबर महिना हा ‘पोषण माह’ म्हणून साजरा करण्यात आला. पोषण चळवळ जनचळवळ व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिन्यात जिल्हाभरामध्ये पोषण मेळावे, पाककृती स्पर्धा, किशोरी मुली आणि महिलांचे हिमोग्लोबिन तपासणे, गृहभेटी, पोषण पंगती, पोषण दहीहंडी, फळाफुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमांची नोंद केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर करण्यात आली होती. यातून गावपातळीवर उत्कृष्ट काम करणाºया अंगणवाडी सेविका, आशा, परिचर,आरोग्य पर्यवेक्षिका, सहाय्यिका यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, खातेप्रमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशा, ग्रामपंचायत यंत्रणा या सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेच्या या कर्मचाºयांनी हे यश मिळविले आहे.
योजनेत समावेश नसताना मिळविले यश
वास्तविक शालेय पोषण अभियानामध्ये कोल्हापूर जिल्'ाचा समावेश नाही. महाराष्ट्रातील २0 जिल्हे या योजनेत आहेत. कोल्हापूरचा तिसºया टप्प्यात समावेश होणार आहे. त्यामुळे यासाठी कोणताही निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध नव्हता. तरीही कोल्हापूर जिल्हा परिषदेने चौदावा वित्त आयोग आणि लोकसहभागातून हे सर्व उपक्रम राबवून त्यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक पुरस्कार पटकावण्याची कामगिरी केली हे विशेष.
या पाच महिला कर्मचारी वैयक्तिक पुरस्काराच्या मानकरी
- राजश्री साळसकर
- शोभा लोहार
- वैशाली शितोळे
- स्मिता चोपडे
- संध्या चांदणे
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने चांगली कामगिरी करून दाखविली आहे. सभापती वंदना मगदूम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, त्यांच्या पथकाने सामूहिक शक्तीची प्रचिती आणून दिली. या पाचही महिलांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेची मान आणखी उंचावली आहे.
शौमिका महाडिक
अध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर