पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:10 AM2017-12-30T01:10:00+5:302017-12-30T01:10:00+5:30
नवी दिल्ली/ कोल्हापूर : सर्वांना सहजपणे पासपोर्ट मिळण्यासाठी सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत.
पिंपरी-चिंचवड दुसºया, तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पासपोर्ट) ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात ५९ केंद्र सुरू करण्यात आली.
एकवीस हजारजणांना कोल्हापुरातून पासपोर्ट
कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून २१ हजार ९५ जणांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. देशात हा उच्चांक आहे. पिंपरी-चिंचवडमधून २० हजार ८३, तर औरंगाबादमधून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. पासपोर्ट वितरणात कर्नाटकातील म्हैसूर तिसºया, तर गुजरातमधील भूज चौथ्या क्रमांकावर आहे.
गेल्या दहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील प्रधान डाकघरात पासपोर्ट केंद्र कार्यान्वित झाले. याठिकाणी आम्ही कमीत कमी कागदपत्रे आणि वेळेत पासपोर्टधारकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या कामाची पोचपावती मिळाली आहे. पासपोर्ट वितरणात कोल्हापूर हे देशात प्रथम येणे हे अभिमानास्पद आहे.
- रमेश पाटील, मुख्य अधीक्षक, प्रधान डाकघर कोल्हापूर