कोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलासह वडिलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:19 PM2018-08-21T16:19:33+5:302018-08-21T16:24:56+5:30

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी दौलतनगर येथील मुलासह वडिलावर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Kolhapur: Torture of minor girl by knife and tortured with child; | कोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलासह वडिलावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलासह वडिलावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देचाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलासह वडिलावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी दौलतनगर येथील मुलासह वडिलावर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित मुलगा अरविंद महादेव वडर (वय २४ ), वडिल महादेव कल्लाप्पा वडर ( ५० , रा. दौलतनगर, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

‘ तुझे १८ वर्ष पूर्ण झाले की, तुला घरातून उचलून नेऊन माझ्या मुलाशी लग्न लावेन अशी दमदाटी वडिलांनी पीडित मुलीच्या घरात जाऊन केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक औंदुबर पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

याबाबत पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले, दीड वर्षापुर्वी महादेव वडर याने संबधित कुटूंबाकडे मुलीची मागणी आपल्या मुलासाठी केली. त्यामुळे अरविंद हा मार्च २०१७ पासून तिच्या पाठिमागे लागला.

पीडीत मुलीच्या घरी कोण नसल्याचे पाहून तिचा महाविद्यालयातील मार्गावर दूचाकीवरुन पाठलाग त्याने सुरु केला. तसेच मध्ये रस्त्यावर थांबून तिच्याबरोबर मोबाईलवर जबरदस्तीन सेल्फी काढून मारहाण केली . चाकूचा धाक दाखवून तिला दूचाकीवर बसवून रंकाळा, टेंबलाईवाडी येथे नेले. तिथे जाऊन तिला मारहाण केली.

दरम्यान, त्याने स्वत:च्या घरात कोणी नसल्याचे पाहून तसेच लॉजवर नेऊन तिच्याशी अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने ती मुलगी १५ दिवस घरात शांत राहत होती. यामुळे तिच्या आईने याबाबत मुलीकडे विचारणा केली असता तिने हा प्रकार आपल्या आईसमोर कथन केला.

अखेर संबधित मुलीच्या आई सोमवारी (दि.२०) रात्री उशिरा पोलिस ठाण्यात आली. यावेळी मुलीने घडलेला प्रकार पोलिसांसमोर सांगितला. त्यानंतर संशयित अरविंद वडर व त्याचे वडिल महादेव वडर यांना पोलिसांनी अटक केली. संशयित अरविंद हा मोलमजुरी करतो तर वडिल घरी असतात.
 

वडिलांना कल्पना नाही...

अरविंदने केलेल्या अत्याचाराची माहिती महादेव वडर यांना  नव्हती. त्यानी घरात जाऊन दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

अ‍ॅसिड फेकून ठार मारण्याची धमकी...

संबधित अल्पवयीन मुलीने कोठे जाण्यास नकार दिला तर अरविंद हा ‘तुझ्या लहान बहिणीवर अ‍ॅसिड फेकून तिला ठार मारीन’ अशी धमकी देत व तिला दूचाकीवर बसवून विविध ठिकाणी नेत असत. त्याचबरोबर पीडीत मुलीशी वाद घालताना अरविंदला कोणी अडविले तर तो आमचा घरचा मामला आहे, असे सांगून तो दुसऱ्यांना गप्प बसवत, अशी माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Torture of minor girl by knife and tortured with child;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.