कोल्हापूर : पर्यटकांना ‘आडवाटेवरच कोल्हापूर’चे मोफत दर्शन, १३ एप्रिल पासून दोन बसेस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 04:12 PM2018-03-28T16:12:12+5:302018-03-28T18:53:55+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटन स्थळे व त्यांचा इतिहास लोकासमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरच कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. १३ एप्रिल पासून शुक्रवार व शनिवारी दोन-दोन बसेस सुटणार असून यामध्ये ५० टक्के स्थाथिक पर्यटकांना तर उर्वरित बाहेरील पर्यटकांना राखीव राहील असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटन स्थळे व त्यांचा इतिहास लोकासमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरच कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. १३ एप्रिल पासून शुक्रवार व शनिवारी दोन-दोन बसेस सुटणार असून यामध्ये ५० टक्के स्थाथिक पर्यटकांना तर उर्वरित बाहेरील पर्यटकांना राखीव राहील असेही त्यांनी सांगितले.
हिल रायडर्स फौंडेशन, एक्टीव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सहलीचे आयोजन केले असून हॉटेल मालक संघ, विविध संघटना, बचत गटांचे सहकार्य लाभल्याचे सांगत पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड म्हणाले, कोल्हापूरात पर्यटक आला की जोतिबा, अंबाबाई, नृसिंहवाडी येथे पर्यंत मर्यादीत राहतो. पण कोल्हापूरच्या दुर्गम डोंगरात अनेक छुपी पर्यटनस्थळे आहेत. प्राचीन गुहा, गड, शिल्पे, युध्दभूमी, मंदीरे, जंगले यांचे दर्शन पर्यटकांना व्हावे, पर्यटनस्थळे सक्षम होतीलच पण तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी ही संकल्पना पुढे आणली.
कोल्हापूर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिग्लज तालुक्यातील बारा हून अधिक प्रक्षेनिय स्थळे दाखवली जाणार आहे. दोन्ही बसमध्ये तीन मुले व तीन मुली गाईड म्हणून राहणार आहे.
निसर्ग मित्र अनिल चौगुले म्हणाले, सहलीचा मार्ग निसर्गरम्य आहे. शिवडाव येथील देवराई व तेथील लोकांचे नाते वेगळे आहे. येथे पंचमहाभुतांचा अनुभव येतो, इतका सुंदर परिसर आहे. अशी अनेक ठिकाणे आपण या माध्यमातून पाहू शकणार आहे.
असा असणार सहलीचा मार्ग-
दसरा चौक-पोहाळे (ता. पन्हाळा) लेणी-शिवाजीची विहीर-पावनखिंड, येळवण जुगाई मंदीर-अणुस्कुरा जंगलात पदभ्रंमती-तिसंगी (जेवण)-पळसंबा शिल्प- सांगशी-बोरबेट जंगलातून चक्रेश्वरवाडी-काळम्मावाडक्ष (रात्रीची विश्रांती)-कडगाव, पाटगाव मौनी महाराज मठाचे दर्शन-शिवडाव येथील देवराई, मेघोली-शिरसंग येथील वटवृक्ष-नेसरी-कोल्हापूर.
अस्सल ग्रामीण नाष्टा-जेवण
चहा-नाष्टा व दोन्ही वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. तेथील अस्सल पारंपारिक जेवण स्थानिक बचत गट देणार आहेत. त्यामध्ये नाचणीची भाकरी, डांगर, पिठल्याचा आश्वाद घेता येणार आहे.
आॅनलाईन बुकींग
दोन दिवसाची मुक्कामी सहल, निवास, भोजन व्यवस्था मोफत आहे. आॅनलाईन बुकींग करून यामध्ये सहभागी होता येणार असून बुकींग नुसारच पर्यटकांना संधी दिली जाणार आहे. एका सहलीत शंभर व्यक्ती सहभागी होऊ शकतात. बुकींगसाठी नोंदणी करायची आहे. त्याशिवाय याबाबत अधिक माहितीसाठी समित एॅडव्हेन्टचर्स, पर्ल हॉटेल जवळ, कोल्हापूर. येथे संपर्क साधावा.
आडवाटेवरची वैशिष्टये-
राष्ट्रीय अभयारण्याचा अनुभन
६०० पैकी १०० किलो मीटरचा जंगलातून प्रवास
३ किलो मीटरचा जंगलातून पदभ्रमंती
प्राचीन गुहा, शिलालेख, वास्तू मंदीरे असा पुरातत्व ठेवा
रोमांचकारी युध्दभूमीचा परिसराला भेट
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून भव्य पठार, खोल दऱ्या व समृध्द जंगाचा नजराणा.
‘रानमेवा’ चाखण्याची संधी
चक्रेश्वरवाडी येथे ३६० डिग्री मधून आकाशाचे निरीक्षण
असे आहे नियोजन-
वार तारीख कोणासाठी
शुक्रवार १३ एप्रिल फक्त पुरूष
शनिवार १४ एप्रिल फक्त महिला
शुक्रवार २० एप्रिल फक्त पुरूष
शनिवार २१ एप्रिल फक्त महिला
शुक्रवार २७ एप्रिल फॅमिली/ सहकुटूंब
शनिवार २८ एप्रिल फक्त पुरूष
शकु्रवार ४ मे फक्त पुरूष
शनिवार ५ मे फक्त महिला
शुक्रवार ११ मे फक्त पुरूष
शनिवार १२ मे फक्त महिला
शुक्रवार १८ मे फॅमिली/सहकुटूंब
शनिवार १९ मे फक्त पुरूष
शुक्रवार २५ मे फक्त महिला
शनिवार २६ मे फॅमिली/ सहकुटूंब