कोल्हापूर हादरले... ३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:51+5:302021-04-20T04:26:51+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी ३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये इतर जिल्ह्यांतील सात जणांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग ...
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी ३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये इतर जिल्ह्यांतील सात जणांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासूनची ही मृतांची उच्चांकी संख्या आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि नागरिकही हादरले.
दरम्यान, नवे ४३१ रुग्ण नोंदविण्यात आले असून, नागरिकांनी आता तरी गांभीर्याने परिस्थिती समजून घेण्याची गरज असून, एप्रिलअखेरपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये सर्वाधिक ३३ मृत्यूची संख्या नोंदवली होती. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून, कोल्हापूर जिल्ह्याभोवतीचा कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्टच होताना दिसत आहे.
कोल्हापूर शहरामध्ये १७९ रुग्ण आढळले असून इतर जिल्ह्यांतील आणि इतर राज्यांतील ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. बाराही तालुक्यात करवीर आणि शिरोळमध्ये सर्वाधिक म्हणजे ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरामध्ये १५४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. २५७२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ६८९ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून ४०३४ सक्रिय रुग्ण आहेत.
एकीकडे मुंबई, पुण्यासह बाहेरच्या राज्यांतून आणि शहरांतून नागरिक मोठ्या संख्येने गावाकडे येत असून, रोजीरोटी सुरू ठेवण्यासाठी शिथील केलेल्या नियमांचा नागरिक गैरफायदा घेत आहेत. मृतांमध्ये कोल्हापूरच्या सात तर इचलकरंजीच्या सहा जणांचा समावेश आहे.
चौकट
मृतांमध्ये २३ पुरूष
या ३४ मृतांमध्ये २३ पुरुषांचा समावेश असून ११ महिलांचाही मृत्यू झाला आहे. मृतांत कोल्हापूर, इचलकरंजीचे प्रत्येकी ७, तर हातकणंगलेच्या ५ जणांचा समावेश आहे. कमीत कमी २६ वर्षांच्या तरुणीपासून ८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांचा मृतांत समावेश आहे.
तालुकावार मृतांची माहिती अशी :
कोल्हापूर : न्यू शाहूपुरीतील ५७ वर्षीय महिला, शास्त्रीनगर येथील ७९ वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील ७७ वर्षीय पुरुष, मुक्त सैनिक वसाहत येथील ८३ वर्षीय पुरुष, फुलेवाडी येथील ३५ वर्षीय महिला, राजारामपुरीतील ५३ वर्षीय पुरुष, सुर्वेनगरमधील हस्तिनापूर येथील ४० वर्षीय पुरुष.
इचलकरंजी : टाकवडे वेस येथील ३८ वर्षीय पुरुष, म्हेतर गल्ली येथील ६७ वर्षीय पुरुष, बंडगर मळा येथील ७१ वर्षीय पुरुष, शहापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, दत्तनगर शहापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, दत्तनगर येथील ४९ वर्षीय पुरुष, अयोध्या पार्क येथील ५५ वर्षीय महिला.
गडहिंग्लज : दुर्गुळवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष,
शाहूवाडी : रेठरे येथील ६९ वर्षीय पुरुष, चरण येथील ७० वर्षीय पुरुष.
करवीर : मुडशिंगी येथील ५२ वर्षीय पुरुष, कणेरीवाडी येथील ४४ वर्षीय पुरुष.
भुदरगड : म्हासरंग येथील ७० वर्षीय पुरुष.
हातकणंगले : हुपरी येथील ५० वर्षीय महिला, रुकडी येथील ६१ वर्षीय महिला, नरंदे येथील ७० वर्षीय महिला, खोतवाडी येथील ८३ वर्षीय पुरुष, गावभाग शहापूर येथील ८२ वर्षीय महिला.
राधानगरी : कासारपुतळे येथील ६२ वर्षीय महिला.
शिरोळ : दानोळी येथील ६० वर्षीय महिला.
इतर जिल्हे : पाल (जि. रायगड) येथील ५९ वर्षीय महिला, मिरज जि. सांगली येथील ५५ वर्षीय पुरुष, अशोकनगर पुणे येथील २६ वर्षीय तरुणी, नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील ७९ वर्षीय व सावंतवाडी येथील ७३ वर्षीय पुरुष, घोडेगाव पुणे येथील ४२ वर्षीय पुरुष, गारवे (जि. सातारा) येथील ४० वर्षीय पुरुष यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.