नाद करा पण कोल्हापुरकरांचा कुठं! सातवीत शिकणारा चिमुरुडा बनला कोट्यधीश; क्रिकेटच वेड ठरलं लकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 06:42 PM2023-01-26T18:42:09+5:302023-01-26T18:43:52+5:30

लोक सत्कार करताहेत, फोटो, सेल्फी, स्टेटस लावताहेत पण याने तसूभर ही विचलित न होता कोट्याधीश झालेला मुरगूड ता कागल मधील सक्षम बाजीराव कुंभार हा मुलगा सांगतो आहे मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं आहे.

Kolhapur trending News! Seventh class boy became a millionaire; making cricket team on app NZ vs india | नाद करा पण कोल्हापुरकरांचा कुठं! सातवीत शिकणारा चिमुरुडा बनला कोट्यधीश; क्रिकेटच वेड ठरलं लकी

नाद करा पण कोल्हापुरकरांचा कुठं! सातवीत शिकणारा चिमुरुडा बनला कोट्यधीश; क्रिकेटच वेड ठरलं लकी

googlenewsNext

- अनिल पाटील

मुरगूड :- वय अगदी बारा तेरा वर्षाच, सातवीत शिकणारा सक्षम तसा क्रिकेट वेडा, महेंद्र धोनी फार आवडायचा मग तो सांगतो गेम खेळा, टीम करा म्हणून बेस्ट प्लेअर निवडले आणि टीम केली, मंगळवारी रात्री भारत न्यूझीलैंड मॅच झाली आणि मला सर्वात जास्त पॉइंट मिळाले अस समजलं, अगदी अर्धा तासात माझ्या आईच्या बँक खात्यावर सुमारे सत्तर लाख जमा झाले आणि सुरू झाला एक आगळा वेगळा प्रवास, गेले दोन तीन दिवस अगदी घर भरून गेलं आहे. लोक सत्कार करताहेत, फोटो, सेल्फी, स्टेटस लावताहेत पण याने तसूभर ही विचलित न होता कोट्याधीश झालेला मुरगूड ता कागल मधील सक्षम बाजीराव कुंभार हा मुलगा सांगतो आहे मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं आहे.

ऑनलाइन क्रिकेट गेम वर अनेकजण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातील हा सक्षम अजिबात नाही, मोबाइल इंटरनेट याचे कमालीचे ज्ञान त्याला या कामी उपयोगी आले. कोरोना काळात शाळा बंद झाल्या पण मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरू झाला अर्थातच त्यातच इंटरनेट आणि मोबाइल याच अफाट ज्ञान शेकडो विद्यार्थ्यांना मिळालं त्यातील एक सक्षम, सक्षम तसा शैक्षणिक दृष्ट्या ही सक्षम आहे. येथील मुरगूड विद्यालयात तो सेमीच्या सातवीच्या वर्गात शिकतो आहे.तर पाचवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत तो चमकला आहे.सर्वच उपक्रमात त्याचा वावर ठरलेला असतो.

क्रिकेट च प्रचंड वेड असलेला सक्षम भारतीय टीम मधील खेळाडूंची माहिती अगदी पटापट सांगतो पण अन्य देशातील ही कोणता खेळाडूकसा आहे याची जणू कुंडली त्याच्याकडे आहे. मंगळवार दि २४ जानेवारी अर्थातच शाळेचे गॅदरिंग सोमवरी झालेने त्याला मंगळवारी सुट्टी मिळाली आणि सक्षम भारत आणि न्यूझीलंड मॅच सूर होण्या अगोदर टीव्ही समोर बसला.आई बाबांना सांगत त्याने आपली टीम तयार केली. या संघामध्ये त्याने डी. कॉन्वेला संघाचा कर्णधार बनवला होता तर रोहित शर्माला उपकर्णधार बनवला होता, तसेच त्याच्या संघातील शार्दूल ठाकूर, हार्दिक पांड्या, शुभमन गिल या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याने त्याच्या ड्रीम वरील संघाने बक्कळ गुणांची कमाई केली. सुमारे ८० लाख खेळणाऱ्या सदस्यांमध्ये सक्षम ने तयार केलेल्या टीम मधील खेळाडूंनी गुणांची कमाई करण्यात सुरवात केली. सुमारे साडे बाराशे गुणांची कमाई  झाली. हे गुण सर्वाधिक ठरल्याने सुमारे एक कोटी रुपयांचा आपण मानकरी झालेच सक्षमला समजले.

   ही बातमी आजूबाजूला समजल्यानंतर काही कालावधीत त्याच्या खात्यावर सुमारे सत्तर लाख जमा झाले. आणि गल्लीत गावात जल्लोष सुरू झाला. रात्री गावचे ग्रामदैवत अंबाबाई चरणी सक्षम नतमस्तक झाला आणि मंदिर वास्तू साठी भरीव मदत करण्याचे अभिवचन त्याने दिले. ज्या शाळेत तो शिकतो त्या शाळेतील सर्व शिक्षकांनी त्याचा सत्कार केला. या सर्वाचे सक्षम भारावला होता पण त्याचा आत्मविश्वास मात्र कमी झाला नव्हता. यापुढे आता असला खेळ खेळू नको असा सज्जड दम ही शिक्षकांनी जाता जाता दिला आणि सक्षमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याला बळ देण्याचे आश्वासन ही दिले.

Web Title: Kolhapur trending News! Seventh class boy became a millionaire; making cricket team on app NZ vs india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.