कोल्हापूर : फळाची अपेक्षा न करता काम करणारा खरा ‘बजरंगी ’ : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:28 PM2018-05-26T15:28:06+5:302018-05-26T15:28:06+5:30
कार्यकर्त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता देव, देश आणि धर्म यासाठी काम करावे. कामावरची निष्ठा हीच चांगल्या संघटकाची लक्षणे आहेत. आणि तोच खरा ‘बजरंगी ’ कार्यकर्ता बनू शकतो. असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
कोल्हापूर : कार्यकर्त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता देव, देश आणि धर्म यासाठी काम करावे. कामावरची निष्ठा हीच चांगल्या संघटकाची लक्षणे आहेत. आणि तोच खरा ‘बजरंगी ’ कार्यकर्ता बनू शकतो. असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मैदानावर विश्व हिंदु परिषदेतर्फे आयोजित केलेल्या बजरंग दलाचा शौर्य प्रशिक्षण वर्गाचे सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, बजरंग बलीने कार्यकर्ता कसा असावा हा आदर्श घालून दिला आहे. त्यानूसार कार्य करत रहा.
सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वाटावे असे काम करणारा कार्यकर्ता केवळ बजरंग दलामध्ये आहे. त्यानूसार समाजातील दृष्ट प्रवृत्तीना ठेचण्यासाठी बजरंगीनी आपल्याला दिलेल्या प्रशिक्षणचा करावा. त्यातून समाज भयमुक्त होईल, असे कार्य करा.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा क्रमांक दोनचा मंत्री असा प्रवास सांगितला. या प्रवासात अनेक अडचणींना तोंड देत प्रतिकुल परिस्थितीत काम केले आहे.
यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि परिवारातील अनेक संघटनेत काम करुन इथपर्यंत पोहचलो आहे. या सर्वांची जाणीव कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात कायम राहीली आहे. प्रास्ताविक विश्वहिंदु परिषदेचे शहर मंत्री कैलास कार्इंगडे यांनी, तर सहमंत्री अॅड. सुधीर वंदुरकर यांनी मानले.
गेले आठवडाभरापासून सुरु असलेल्या या शिबीरात दोनशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात नियुद्ध, दंड प्रशिक्षण, रायफल ट्रेनिंग, दांडपट्टा, खडग, कवायात आदींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई, पदाधिकारी श्रीकांत पोतनीस, कॅप्टन प्रभाकर सावंत, बंडा साळुंखे, अशोक रामचंदाणी, सुधीर सुर्यवंशी, रिंकु पोवार, रणजित आयरेकर, भवन पटेल, महेश कामत, किशोर घाटगे, राहूल चिकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.