कोल्हापूर : तुळशी धरण भरले, नदीपात्रात ११६४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:09 AM2018-07-23T11:09:14+5:302018-07-23T11:09:32+5:30
धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला.
श्रीकांत ऱ्हायकर
कोल्हापूर/धामोड : धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला.
दुपारी बारा वाजुन पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातुन ११६४ क्युसेक्स इतक्या वेगाने तुळशी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने व पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
प्रारंभी पाण्याचे पुजन सहायक अभियंता श्रेणी १चे रोहीत बांदिवडेकर व एन .जी. नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळ पासुनच तुळशी धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.
सायंकाळी ४ वाजेपर्यंत ६८ मिली मिटर इतका पाऊस झाला असुन, दुपारी १२ .४५ च्या दरम्यान धरणाच्या तिन्ही वक्रदरवाजातून प्रतिसेकंद ११६४ इतक्या वेगाने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले. गतसालच्या तुलनेत धरण परिसरात दुप्पट पावसाची नोंद झाली आहे . यावर्षी आजआखेर २३१८ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.
धरण बांधणीच्या इतिहासात प्रथमतःच माहिनाभर अगोदरच धरण भरल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला आहे.
येत्या कांही दिवसात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता शिवाजी कळके यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. यावेळी उपअभियंता एस .एम. गुरव, एम.के. पाटील, ईश्वरा पाटील, बाळासो मगदूम, पांडूरंग मगदूम, महादेव देवार्डेकर आदी उपस्थित होते .