कोल्हापूर : बेकायदेशीर बंदूक वापरल्याप्रकरणी इस्लामपुरच्या छायाचित्रकारासह दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 02:34 PM2018-03-12T14:34:26+5:302018-03-12T14:34:26+5:30
गिरगांव (ता. शाहूवाडी) येथील वनविभागात पाठीवर अडकवलेल्या बारा बोअर बंदुकीतून गोळी सुटून छायाचित्रकार गंभीर जखमी झाला होता. ही बंदूक बेकायदेशीर वापरल्याप्रकरणी छायात्रिकारासह बंदूक मालकावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : गिरगांव (ता. शाहूवाडी) येथील वनविभागात पाठीवर अडकवलेल्या बारा बोअर बंदुकीतून गोळी सुटून छायाचित्रकार गंभीर जखमी झाला होता. ही बंदूक बेकायदेशीर वापरल्याप्रकरणी छायात्रिकारासह बंदूक मालकावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला.
संशयित छायाचित्रकार संग्राम यशवंत चव्हाण (वय २८, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), नाना चंदू सुर्यगंध (७४, रा. ओझर्डे, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. चव्हाण हा जखमी झाला होता.
अधिक माहिती अशी, नाना सुर्यगंध हे माजी सैनिक आहेत. १९८१ मध्ये जिल्हाधिकारी गुहावटी राज्य आसाम येथून त्यांनी आॅल इंडिया आत्मसंरक्षण हत्यार परवान्याची मंजूरी घेतली होती. त्यांची बंदूक घेऊन संग्राम चव्हाण हा दि. ७ रोजी मित्रांसोबत गिरगांव येथील वनविभागात आला होता.
लोड केलेली बंदूक त्याने खांद्याला अडकवली होती. जंगलातून धावताना बंदुकीतून अचानक गोळी सुटून त्याच्या पार्श्वभागात घुसून तो गंभीर जखमी झाला. तो शिकारीच्या उद्देशाने याठिकाणी आलेचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार शाहुवाडी पोलीसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी फिर्याद स्वत: पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली आहे.