कोल्हापूर : सदर बजारमध्ये दुचाकी पेटवली, अ‍ॅपे रिक्षाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:18 AM2018-12-25T11:18:43+5:302018-12-25T11:20:24+5:30

विचारेमाळ येथील शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केलेली दुचाकी पेटवून अ‍ॅपे रिक्षाची तोडफोड केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अज्ञातांचे हे कृत्य असून, वाहन मालकांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यक्तिद्वेषातून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात आहे.

Kolhapur: A two-wheeler raided in Sadar Bazaar, Aadha rickshaw collapsed in Kolhapur: A two-wheeler was struck in the market, apricot rickshaw collapsed | कोल्हापूर : सदर बजारमध्ये दुचाकी पेटवली, अ‍ॅपे रिक्षाची तोडफोड

विचारेमाळ येथे अज्ञातांनी पेटवलेली दुचाकी.

googlenewsNext
ठळक मुद्देसदर बजारमध्ये दुचाकी पेटवली, अ‍ॅपे रिक्षाची तोडफोडअज्ञातांचे कृत्य : शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर : विचारेमाळ येथील शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केलेली दुचाकी पेटवून अ‍ॅपे रिक्षाची तोडफोड केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अज्ञातांचे हे कृत्य असून, वाहन मालकांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यक्तिद्वेषातून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात आहे.

अधिक माहिती अशी, जमीर नुरमुहमद शेख यांची दुचाकी (एम. एच. ०९ सी. पी. २८३१) आहे. तर आय्याज दस्तगीर गजबर यांची अ‍ॅपेरिक्षा (एम. एच. ०९ बी. सी. ५७७६) आहे. जमीर हे महाद्वार रोडवर हातगाड्यावर किरकोळ साहित्य विक्री करतो, तर आय्याज यांचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय आहे. दोघेही विचारेमाळ येथे राहतात. त्यांनी रविवारी दुचाकी व अ‍ॅपेरिक्षा शाहू कॉलेजसमोर रस्त्याकडेला पार्किंग केल्या होत्या.

सोमवारी सकाळी पाहतात, तर दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अ‍ॅपेरिक्षाची तोडफोड केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हे कृत्य केले. दोन्ही वाहनांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

हा प्रकार पूर्ववैमनस्य आणि व्यक्तिद्वेषातून घडल्याची चर्चा परिसरात आहे. शेख आणि गजबर या दोघांचा कोणाशी वाद आहे काय, यासंबंधी पोलीस चौकशी करीत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील करीत आहेत.

 

Web Title: Kolhapur: A two-wheeler raided in Sadar Bazaar, Aadha rickshaw collapsed in Kolhapur: A two-wheeler was struck in the market, apricot rickshaw collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.