कोल्हापूर : राजेंद्रनगरमधील दोन महिला चोरट्यांना अटक, ७४ हजार किमतीच्या साड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:22 PM2018-08-01T13:22:21+5:302018-08-01T13:51:34+5:30

राजारामपुरी मेन रोड येथील कापड दुकानाचे शटर उचकटून साड्या चोरणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील दोन सराईत महिला चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित लता बापू पाटोळे (वय ४०), राजश्री दत्ता नाईक (२८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ७४ हजार किमतीच्या साड्या पोलिसांनी जप्त केल्या.

Kolhapur: Two women thieves arrested in Rajendranagar, Rs 74 thousand worth of saris were seized | कोल्हापूर : राजेंद्रनगरमधील दोन महिला चोरट्यांना अटक, ७४ हजार किमतीच्या साड्या जप्त

कोल्हापूर : राजेंद्रनगरमधील दोन महिला चोरट्यांना अटक, ७४ हजार किमतीच्या साड्या जप्त

Next
ठळक मुद्देराजेंद्रनगरमधील दोन महिला चोरट्यांना अटक७४ हजार किमतीच्या साड्या जप्त

कोल्हापूर : राजारामपुरी मेन रोड येथील कापड दुकानाचे शटर उचकटून साड्या चोरणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील दोन सराईत महिला चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित लता बापू पाटोळे 

(वय ४०), राजश्री दत्ता नाईक (२८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ७४ हजार किमतीच्या साड्या पोलिसांनी जप्त केल्या.


संशयित राजश्री दत्ता नाईक

अधिक माहिती अशी, वसुधा विश्वास कुलकर्णी (४३, नागेशकर हाईट, राजारामपुरी २ गल्ली) यांच्या मालकीचे राजारामपुरी तिसरी गल्ली येथे विमल विहार अपार्टमेंटमध्ये लेडीज शॉपी नावाचे कापड दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी साड्या चोरून नेल्या होत्या.

येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करताना महिला दिसून आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी राजेंद्रनगर परिसरात वास्तव्यास असणाºया या सराईत महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.



 

 

Web Title: Kolhapur: Two women thieves arrested in Rajendranagar, Rs 74 thousand worth of saris were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.