तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर कोल्हापूर अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 12:57 PM2021-07-05T12:57:58+5:302021-07-05T12:59:46+5:30
CoronaVIrus In Kolhapur : तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर संपूर्ण कोल्हापूर शहर सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर नागरीकांची तसेच वाहनांची गर्दी झाली.
कोल्हापूर : तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर संपूर्ण कोल्हापूर शहर सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर नागरीकांची तसेच वाहनांची गर्दी झाली.
तब्बल तीन महिन्यानंतर सराफी दुकान उघडताना साफसफाई, स्वच्छता झाल्या एका सराफ व्यावसायिकाने चक्क रस्त्यावरुन दुकानाची पूजा केली.कोल्हापुरातील चप्पल लाईनवरील एक दुकानदार सोमवारी आपल्या दुकानात दर्शनी भागात चपला लावून ग्राहकांच्या सेवेत पुन्हा सक्रिय झाला.
कोल्हापुरातील कोरोना संसर्गामुळे साड्यांची, कापडांची दुकाने बंद राहिली. सोमवारी अनलॉक होताच एक महिला ग्राहक दुकाने उघडल्याची संधी साधत दुकानात जाऊन साडी खरेदीचा आनंद लुटला. कोल्हापुरात कपड्यांच्या दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता दुकानाच्या दारात मेल-फिमेल स्टॅच्यू लावण्यात महिला कर्मचारी व्यस्त होती.