Kolhapur: प्राधिकरणास सवतीच्या पोराची वागणूक, मोठ्या अडथळ्यांची शर्यत; रडतकढतच कारभार सुरू

By भारत चव्हाण | Published: May 30, 2023 05:04 PM2023-05-30T17:04:44+5:302023-05-30T17:07:39+5:30

राज्यकर्त्यांनी आपली भूमिका अशीच कायम ठेवली तर पुढच्या शंभर वर्षांत या गावांचा विकास होईल, यावर विश्वास ठेवणे अशक्य

Kolhapur Urban Area Development Authority established for the development of Kolhapur city and 42 surrounding villages is in dire condition | Kolhapur: प्राधिकरणास सवतीच्या पोराची वागणूक, मोठ्या अडथळ्यांची शर्यत; रडतकढतच कारभार सुरू

Kolhapur: प्राधिकरणास सवतीच्या पोराची वागणूक, मोठ्या अडथळ्यांची शर्यत; रडतकढतच कारभार सुरू

googlenewsNext

भारत चव्हाण 

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व आसपासच्या ४२ गावांतील विकास सुनियोजित व सुनियंत्रित पद्धतीने करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झाली; परंतु सरकारने ‘पोत्यात पाय बांधून पळायला’ सांगितल्यामुळे अजून हे प्राधिकरणच सुनियंत्रित झालेले नाही. स्थापनेसासून ‘सवतीचे पोर’ बनलेल्या प्राधिकारणाचा कारभार अनेक अडथळ्यांना समोरे जात रडतकढत सुरू आहे. राज्यकर्त्यांनी आपली भूमिका अशीच कायम ठेवली तर पुढच्या शंभर वर्षांत या गावांचा विकास होईल, यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे.

कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या विषयावर दोन्ही बाजूंच्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा एक गोंड्स पर्याय पुढे आला. कोणाची मागणी नसताना विकासाच्या ‘जादूची कांडी’ असल्याचे भासवून हे प्राधिकारण कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर लादण्यात आले. हद्दवाढ समर्थक व विरोधक यांनी या जादूच्या कांडीवर विश्वास ठेवून प्राधिकरणाचा स्वीकार केला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हेतू काहीही असला तरी मागच्या सहा वर्षांचे प्राधिकरणाचे ‘प्रगतिपुस्तक’ पाहता हा हेतू फसला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून सरकारने त्यास कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे केवळ विकास परवानगी देण्यापलीकडे प्राधिकरणाचे पाऊल पुढे गेलेले नाही.

मुळात हे प्राधिकरण राज्यातील इतर शहरांत स्थापन केलेल्या महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर आधारित नाही. एखादे शहर आणि आसपासच्या गावांसाठी मिळून केलेले क्षेत्र विकास प्राधिकरण ही राज्यातील पहिलीच संकल्पना आहे. यापूर्वी शहरांतर्गत रस्त्यांना टोल आकारण्याचा प्रयोग प्रथम कोल्हापूर शहरात केला, तशातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने कशा प्रकारे काम करावे, हे जरी स्पष्ट असले, तरी सरकारने त्यास कशा पद्धतीने मदत करावी, याबाबतचे निश्चित धोरण ठरलेले नाही.


अशी आहे प्राधिकरणाची रचना
पदसिद्ध अध्यक्ष - पालकमंत्री
सदस्य सचिव - उपसंचालक नगररचना, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण.
पदसिद्ध सदस्य - जिल्हा परिषद अध्यक्ष, कोल्हापूर महापौर, करवीर पंचायत समिती सभापती, हातकणंगले पंचायत समिती, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक, प्राधिकरणाने सुचविलेले तीन तज्ज्ञ व्यक्ती अथवा लोकप्रतिनिधी.

प्राधिकरणात समाविष्ट गावे

करवीर तालुका - शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळिवडे गांधीनगरसह, चिंचवाड, मुडशिंगी नवे वाडदेसह सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळशिरगाव, कणेरी, कंदलगाव, पाचगाव, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, मादळे, सादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगिल खुर्द, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव,
हातकणंगले - टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली (एमआयडीसी वगळून)

Web Title: Kolhapur Urban Area Development Authority established for the development of Kolhapur city and 42 surrounding villages is in dire condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.