कोल्हापूर - लसीकरण आकडेवारी ग्राफिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:11+5:302021-06-03T04:17:11+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतीत व्यापक जनजागृती झाल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात लस घेण्याकरिता लसीकरण केंद्रांवर जात आहेत. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतीत व्यापक जनजागृती झाल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात लस घेण्याकरिता लसीकरण केंद्रांवर जात आहेत. परंतु पर्यादित लसपुरवठा होत असल्याने सर्वांनाच ती मिळत नाही. आता तर पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनी घेण्याचा नियम करण्यात आल्यामुळे केंद्रावरील गर्दी ओसरली आहे. याच गतीने लसीकरण व्हायला लागले तर सर्वांना लस मिळण्यास एक दीड वर्ष तरी जाईल, असे दिसते.
प्रकार अपेक्षित लसीकरण पहिला डोस दुसरा डोस
हेल्थ केअर वर्कर - ३८,२५६ ४२,२८१ २२,२९९
फ्रंटलाईन वर्कर - २९,८२१ ७०,८८८ २४,६९४-
ज्येष्ठ नागरिक -
-४५ ते ६० वयोगट १५,२३,३७२ ३,९६,६८५ ६३,०७८
-६० वर्षापेक्षा जास्त // ४,१०,३३८ १,१९,८०४
-१८ ते ४४ वयोगट - १८,५२,३६८ १५,४५१ ५१८
- एक नजर लसीकरणावर ...
- जिल्ह्यात केवळ १० टक्के लसीकरण
- ४८७० डोस शिल्लक
आता झालेल्या लसीकरणात
एकूण लसीकरण - ११,८६,९०१
कोविशिल्ड -११,१२,९६४
कोव्हॅक्सिन - ७३,९३७
० टक्के लस वाया -
जिल्ह्यात लसीकरणादरम्यान लस खराब होण्याचे प्रमाण ० टक्के आहे.
आतापर्यंत झालेल्या लसीकरणात ५,९७,०१४ पुरुषांनी तर ५,८९,७०१ महिलांनी लस टोचून घेतली.