Kolhapur: शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे, कोणत्या दिवशी कोणती पूजा..जाणून घ्या

By संदीप आडनाईक | Published: October 14, 2023 04:54 PM2023-10-14T16:54:26+5:302023-10-14T17:01:31+5:30

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उद्या, रविवारपासून जागर सुरु हाते आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या नवरात्रोत्सवात श्री ...

Kolhapur: Various Forms of Ambabai in Sharadiya Navratri Festival, Which Day to Worship...Know | Kolhapur: शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे, कोणत्या दिवशी कोणती पूजा..जाणून घ्या

Kolhapur: शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे, कोणत्या दिवशी कोणती पूजा..जाणून घ्या

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उद्या, रविवारपासून जागर सुरु हाते आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी स्तोत्रानुसार विविध रूपांतील पूजा बांधण्यात येणार आहे, अशी माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने दिली. रविवारी पहिल्या दिवशी देवीची पारंपरिक बैठी पूजा होईल. दरम्यान, उद्या, सकाळी नऊ वाजता तोफेच्या सलामीने मंदिरात घटस्थापना होईल.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतीन प्रमुख देवता असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रौत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. यंदा शासकीय पातळीवर हा उत्सव साजरा होत आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या विविध रूपांतील पूजा हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात हे एकमेव मंदिर असेल जिथे या दहा दिवसांत हक्कदार श्रीपूजकांकडून देवीची विविध रूपांतील पूजा बांधली जाते. त्यामुळे भाविकांना आदिशक्तीची विविध रूपे पाहायला मिळतात. त्यामुळेच या पूजेचे मोठे आकर्षण असते. अंबाबाई ही देवता केंद्रस्थानी ठेवून दहा दिवस पूजा बांधल्या जाणार आहेत.

करवीर निवासिनी अंबाबाईची रोज अशी असेल पूजा

-रविवार (दि. १५, प्रतिपदा) पारंपरिक बैठी पूजा
-सोमवार (दि. १६, द्वितिया) श्री महागौरी पूजा
-मंगळवार (दि. १७, तृतिया) श्री कामाक्षी देवी पूजा
-बुधवार (दि. १८, चतुर्थी) श्रीकुष्मांडा देवी पूजा
-गुरुवार(दि. १९, पंचमी) पारंपरिक गजारुढ पूजा
-शुक्रवार (दि. २०, षष्ठी) श्रीमोहिनी अवतार पूजा
-शनिवार (दि, २१, सप्तमी) श्रीनारायणी नमोस्तुते पूजा
-रविवार (दि. २२, अष्टमी) : पारंपरिक महिषासुरमर्दिनी पूजा
-सोमवार (दि. २३, नवमी) : श्री दक्षिणामूर्तिरुपिणी पूजा
-मंगळवार (दि. २४, दशमी-दसरा) : पारंपरिक रथारुढ पूजा

Web Title: Kolhapur: Various Forms of Ambabai in Sharadiya Navratri Festival, Which Day to Worship...Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.