कोल्हापूर : उदगांवात दिवा काढणी, भव्य पिशे मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:51 PM2018-05-15T18:51:44+5:302018-05-15T18:51:44+5:30

उदगांव येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेला सोमवापासून सुरवात झाली. सोमवारी रात्री दिवा काढणी तर आज मंगळवारी सकाळी पिशे व अग्निप्रवेश करण्यात आला. तर सायकांळी मोठया उत्साहात श्री जोगेशवरी देवीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे उदगांवात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. तर यात्रेच्या निमित्ताने पाळणे व दुकाने मोठया प्रमाणात दाखल झाल्याने लाखो रुपयाची उलाढात होत आहे.

Kolhapur: Various religious programs including Udva, Divya Harappan, Magnificent Pish procession | कोल्हापूर : उदगांवात दिवा काढणी, भव्य पिशे मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम 

उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या मुख्यं दिवशी पिशे मिरवणुक झाल्यानंतर अग्निप्रवेश करताना बाराबलूतेदारापैकी पिशे. (छाया- अजित चौगुले, उदगांव)

Next
ठळक मुद्दे उदगांवात दिवा काढणी, भव्य पिशे मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम हजारो भाविकांची उपस्थिती, लाखो रुपयाची उलाढाल

उदगांव : उदगांव येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेला सोमवापासून सुरवात झाली. सोमवारी रात्री दिवा काढणी तर आज मंगळवारी सकाळी पिशे व अग्निप्रवेश करण्यात आला.

सायकांळी मोठया उत्साहात श्री जोगेशवरी देवीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे उदगांवात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. तर यात्रेच्या निमित्ताने पाळणे व दुकाने मोठया प्रमाणात दाखल झाल्याने लाखो रुपयाची उलाढात होत आहे.

सोमवारी रात्री सव्वा बाराच्या जोगणी होणा-या कुंभाराच्या हाताने जोगेश्वरी मंदिरातुन मडके घेवून जोंधळयाचा चौक त्यापुढे असलेल्या आडशेर लाथाडून न बोलता सर्वजण कलेश्वर मंदिरासमोर असलेल्या चेबरमधील पणती काढुन ती जोगेश्वरी मंदिरात मडक्यातुन आणण्यात आली. व दिवा काढणी कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर आज सोमवारी सकाळी बाराबलूतेदारातील सात लोक पिशे झाले होते. यावेळी त्याच्या उजव्या हातात लिंबाचे तर डाव्या हातात बांबळीचा शिरा, डोक्याला व कबरेंला लिंबाचे डाहाळे, कबरेला चाळ बांधुन गावातील प्रत्येकांच्या उब-यांवरील असलेले गुळ व खोबरे गोळा करण्यात आला. त्यानंतर मारुती मंदिराजवळ असलेल्या वेशीजवळ सर्व पिशे एकत्रित आल्यानंतर अकराच्या सुमारास अग्निप्रवेश करण्यात आला.

सायकांळी सात वाजता श्री जोगेश्वरीची भव्यं मिरवणूक काढण्यात आली. यात शेर शेरणी कराडरच्यानं, कोल्हापूरच्यांन, महापूरच्यानं सत्यं जागेणी सभा मिळाली उदं भलं उदं .. च्या गजरात फटक्याची आतिषबाजी करत पारंपारीक वादयाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यांनतर मिरवणुक जुन्या हारीजनवाडयातील थळोबा मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर मिरवणूक पुन्हा मंदिरात नेण्यात आली.

दिवसभरात रीर्व्हस रीक्षा, रेकॉर्ड डॉन्सं स्पर्धा पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. तर यात्रेनिमित्तं उदगांव येथे मोठया प्रमाणात आंबे खरेदी करण्यासाठी नागरीकांनी झुबंड उडवली होती. यामध्ये लाखो रुपयाची उलाढाल झाली आहे. तसेच रात्री विविध मंनोरजन कार्यक्रम पार पडले.

मुकुट व कुस्ती बुधवारी

 बुधवारी सकाळी सहा वाजेल्यापासून जोगेश्वरी यात्रेच्या वैशिष्टं असलेला मुकूट मिरवणूक खेळ होणार आहे. यामध्ये एक नर व दोन मादी असे मुकूट असतात. ते डोक्यावर मुकूट व हातात वेताची काठी घेवून समोर पळणार संवगडी असा हा खेळ पाहण्यासाठी मोठया संख्येने भाविक दाखल झाले आहेत. तर सायकांळी चार वाजता डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगांव टेक्नीकल हायस्कुलच्या पटागंणात जंगी कुस्त्याचे मैदान होणार आहेत.



 

Web Title: Kolhapur: Various religious programs including Udva, Divya Harappan, Magnificent Pish procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.