Vidhan Sabha assembly election result 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आघाडीवर; आवाडे, यड्रावकर यांची विजयी वाटचाल

By समीर देशपांडे | Published: November 23, 2024 10:52 AM2024-11-23T10:52:55+5:302024-11-23T10:57:13+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात सकाळी साडे दहापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १० जागांपैकी ८ जागांवर महायुती आघाडीवर आहे. उर्वरित दोन जागांवरील ...

Kolhapur vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live Mahayutti is leading in 8 out of 10 seats In Kolhapur district | Vidhan Sabha assembly election result 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आघाडीवर; आवाडे, यड्रावकर यांची विजयी वाटचाल

Vidhan Sabha assembly election result 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आघाडीवर; आवाडे, यड्रावकर यांची विजयी वाटचाल

कोल्हापूर : जिल्ह्यात सकाळी साडे दहापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १० जागांपैकी ८ जागांवर महायुती आघाडीवर आहे. उर्वरित दोन जागांवरील महाविकासची आघाडी ही फार मजबूत नाही अशी स्थिती आहे. 

कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आठव्या फेरीअखेर  ४ हजार मतांनी आघाडीवर होते. महायुती पुरस्कृत माजी मंत्री शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर हे आठव्या फेरीअखेर २२ हजारांचे मताधिक्य घेतले असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

Maharashtra Assembly Election Results

इचलकरंजीतून भाजपचे राहूल आवाडे शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे यांच्यापेक्षा सहाव्या फेरीअखेर  १६ हजार मतांनी पुढे होते. राधानगरीतून शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर हे उद्धवसेनेचे के. पी. पाटील यांच्यापेक्षा  सहाव्या फेरीअखेर ८ हजारांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक हे काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांच्यापेक्षा दहाव्या फेरीअखेर १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

कोल्हापूर उत्तरमधून सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये शिंदेसेनेचे राजेश क्षीरसागर पिछाडीवर आहेत. परंतू ही मते आमदार सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील असल्याने नंतर लाटकर आपली आघाडी कायम ठेवतात की क्षीरसागर मुसंडी मारतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चंदगडमधून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अपक्ष शिवाजीराव पाटील आघाडीवर असून जनसुराज्य शक्तीचे संस्थापक विनय कोरे हे चौथ्या फेरीअखेर १६५१ मतांनी पिछाडीवर आहेत. परंतू नंतर ते वाढण्याची शक्यता आहे. करवीरमधून महायुतीचे चंद्रदीप नरके हे काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

Web Title: Kolhapur vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live Mahayutti is leading in 8 out of 10 seats In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.