कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे आजपासून खुले होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:20 PM2018-09-18T16:20:19+5:302018-09-18T16:36:35+5:30
कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे बुधवारपासून सर्व गणेश भक्तांकरीता पाहण्यासाठी खुले होणार आहेत.यात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर, जुना बुधवार पेठ आदी परिसरात सजीव, तर उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरी या परिसरात तांत्रिक व आकर्षक मंदीरे साकारली आहेत. मंगळवारी उशिरापर्यंत मंडळांचे कार्यकर्ते या देखाव्यांवर सादरीकरणासाठी सज्ज होण्यासाठी अखेरचा हात फिरवत होते.
गणेशोत्सवात देखावे तेही उभेउभ प्रतिकृती आणि सद्यस्थितीवर आधारीत सजीव देखावे सादरीकरण करुन पुढील वर्षापर्यंत आपल्या मंडळाचे नाव गणेशभक्तांच्या तोंडी राहावे. त्यातून समाज प्रबोधन व्हावे, या उद्देशाने अनेक मंडळे रात्रीचा दिवस करुन या काळात राबतात. त्यात अनेक मंडळांच्या कार्यकर्ते तहान भुक हरवून आपला देखावा कसा चांगला होईल, याच्याच चिंतेत असतात.
अशा देखाव्यातून प्रबोधन करणे हा उद्देश या मंडळांचा असतो. यात कपिलतिर्थ येथील मित्र प्रेम तरुण मंडळ, शिवाजी पेठेतील जयशिवराय मित्र मंडळ (सर्किट फॅमिली) , सत्यप्रकाश सेवा मित्र मंडळ, रंकाळा टॉवर परिसरातील उमेश कांदेकर युवा मंच (गडकोट सद्यस्थितीवर भाष्य करणारा सजीव देखावा),, तर राजारामपुरीतील दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळ (काल्पनिक मंदीर) जयशिवराय मित्र मंडळ, शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदीर (पेट्रा जार्डन गुहा), शिवाजी उद्यमनगर येथील जयशिवराय मित्र मंडळाने ३० फुटी अवकाशयान व स्पेस सेंटर (तांत्रिक देखावा), मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने अॅड्राईड अॅपवर आधारीत ‘सिंच्यान’ , तर जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळाने साकारलेल्या ‘अपारंपारिक उर्जास्त्रोत ’ तांत्रिक देखाव्याद्वारे उर्जेचे महत्व पटवून दिले आहे.
तोरस्कर चौकातील सोल्जर गु्रपने लोप पावलेल्या आदिवासी संस्कृतीवर देखावा सादर केले आहे. शिपुगडे तालीम मंडळाने ‘स्त्री भू्रण हत्या’ तर हायकमांडो मंडळाने कोल्हापूरातील रखडलेल्या प्रकल्पांवर प्रकाशधझोत टाकणारा देखावा साकारला आहे. मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबने यंदा लग्नातील अपप्रवृती, प्रथा यांवर भाष्य करणारा सजीव व तांत्रिक यांचे मिश्रण असणारा देखावा साकारला आहे. यातील अनेक मंडळांचे काम अंतिम टप्प्यात, तर काही मंडळांचे देखावे सुरु करण्यात आले आहेत.