CoronaVirus Kolhapur : खरेदीच्या लगबगीने कोल्हापूर गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 01:54 PM2021-05-24T13:54:14+5:302021-05-24T14:05:49+5:30

CoronaVirus Kolhapur : गेल्या आठ दिवसाच्या कडकडीत लॉकडाऊनमुळे घरात थांबलेली जनता अनलॉकला सुरवात होताच सोमवारी रस्त्यावर आली. त्यामुळे शहरातील खरेदीची लगबग वाढली. बाजारपेठा फुलल्या, रस्ते गजबजले. लॉकडाऊनमधील उदास, निर्मनुष्य रस्त्यांना जीवंतपणा आला. बाजारपेठेतून नागरीकांची मोठी गर्दी उसळली खरी, परंतु या गर्दीवर पोलिस व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यात यश आले.

Kolhapur was abuzz with shopping | CoronaVirus Kolhapur : खरेदीच्या लगबगीने कोल्हापूर गजबजले

CoronaVirus Kolhapur : खरेदीच्या लगबगीने कोल्हापूर गजबजले

Next
ठळक मुद्देखरेदीच्या लगबगीने कोल्हापूर गजबजले आठ दिवसानंतर जनता रस्त्यावर, शहराला आला जीवंतपणा

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसाच्या कडकडीत लॉकडाऊनमुळे घरात थांबलेली जनता अनलॉकला सुरवात होताच सोमवारी रस्त्यावर आली. त्यामुळे शहरातील खरेदीची लगबग वाढली. बाजारपेठा फुलल्या, रस्ते गजबजले. लॉकडाऊनमधील उदास, निर्मनुष्य रस्त्यांना जीवंतपणा आला. बाजारपेठेतून नागरीकांची मोठी गर्दी उसळली खरी, परंतु या गर्दीवर पोलिस व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यात यश आले.

शहरात दि. १४ एप्रिलच्या रात्रीपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या काळात सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची परवानगी होती. रुग्णांची संख्या वाढतच राहिल्याने अखेर १५ मे च्या रात्री बारा वाजल्यापासून कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून शहरातील संपूर्ण जनता घरात बसून होती. सोमवारपासून पुन्हा सकाळी सात ते अकरा अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

कडकडीत लॉकडाऊन संपताच सोमवारी सकाळी मात्र नागरिकांनी खरेदीच्या निमित्ताने रस्त्यावर प्रचंड गर्दी केली. सकाळी सात वाजताच अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने उघडली गेली. त्यामुळे रस्ते नागरिकांच्या तसेच वाहनांच्या गर्दीने फुलले. शहरातील चौक अन् रस्ते गजबजून गेले. वातावरणातील गोंगाट सुरु झाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत तर ही गर्दी हटता हटली नाही. शहरात सगळीकडे रांगाच रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या.
 

Web Title: Kolhapur was abuzz with shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.