कोल्हापूर : पन्हाळ्यातील बालग्राम संस्थेला वॉटर प्युरिफायरची मदत, शाहू छत्रपती यांच्यामार्फत ७० व्या वाढदिवसानिमित्त भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:32 AM2018-01-09T11:32:20+5:302018-01-09T11:37:33+5:30
पन्हाळा येथील श्रीमंत दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम या बालगृहाला कोल्हापूर येथील शाहू छत्रपती यांच्यामार्फत त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त बालकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक चेतन भोसले, रवींद्र धडेल, सोपान गोसावी, पन्हाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
कोल्हापूर : पन्हाळा येथील श्रीमंत दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम या बालगृहाला कोल्हापूर येथील शाहू छत्रपती यांच्यामार्फत त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त बालकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले.
पन्हाळा येथील बालग्राम या संस्थेला शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त वॉटर प्युरिफायरची भेट देण्यात आली. यावेळी नगरसेवक चेतन भोसले, सोपान गोसावी, पोलीस उपनिरीक्षक गिरी, जी. जी. जोशी, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे, विजय पाटील, रवींद्र धडेल, बालग्राममधील विद्यार्थी उपस्थित होते.
पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक चेतन भोसले, रवींद्र धडेल, सोपान गोसावी, पन्हाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
पन्हाळा येथील बालग्राम ही संस्था गेली ४१ वर्षे अनाथ आणि निराधार मुलांसाठी कार्य करीत आहे. बालग्रामच्या या कार्यासाठी शाहू महाराजांच्या संपूर्ण परिवाराचे मोलाचे योगदान आहे, अशी माहिती बालग्रामचे संतोष गायकवाड यांनी प्रास्ताविकात दिली.
यावेळी नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी बालग्रामच्या विद्यार्थ्यांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र धडेल, माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.