कोल्हापूर : जलसंपदा विभागाची पाणीपट्टी मंगळवारपर्यंत भरा, पाच तालुक्यांतील लाभधारकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 07:20 PM2018-03-15T19:20:01+5:302018-03-15T19:20:01+5:30
भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील बागायतदार तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी व थकबाकी मंगळवार (दि. २०) पर्यंत भरावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) तर्फे करण्यात आले आहे.
कोल्हापूर : भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील बागायतदार तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी व थकबाकी मंगळवार (दि. २०) पर्यंत भरावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) तर्फे करण्यात आले आहे.
या पाच तालुक्यांतील बागायतदार, तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची सन २०१७-१८ ची चालू पाणीपट्टी व मार्च २०१८ पर्यंतची थकबाकी रक्कम संबंधित बिटधारक किंवा शाखा कार्यालयात मंगळवार (दि. २०) पर्यंत रोखीने भरणा करूा रितसर पावती घ्यावी.
अन्यथा, नियमानुसार विद्युत उपसायंत्र परवान्याचा विद्युतपुरवठा खंडित करणे किंवा थकीत रकमेचा बोजा संबंधितांच्या सात-बारा पत्रकी नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.