कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे फूल देऊन स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:50 PM2018-06-02T17:50:08+5:302018-06-02T17:50:08+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
रोहन पलंगे यांनी, प्रवाशांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चालक, वाहक व सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असून प्रवाशांना चांगल्या तऱ्हेने सेवा देत आहेत. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळास गतवैभव प्राप्त झाले असल्याचे सांगितले.
१ जून १९४८ रोजी एका बसने सुरुवात झालेला प्रवास आज महामंडळाच्या २५० आगारांत सुमारे १७ हजार बसेस व सुमारे सव्वा लाख कर्मचारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘शिवशाही’ आसनी बसेससाठी ज्येष्ठ नागरिकांना ४५ टक्के व शिवशाही शयनयान बसेससाठी ३० टक्के सवलत सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पलंगे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, आगार व्यवस्थापक वरिष्ठ कोल्हापूर आगार अजय पाटील, आगार व्यवस्थापक कनिष्ठ कोल्हापूर आगार दयानंद पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक कोल्हापूर विभाग अतुल मोरे, सहायक वाहतूक अधीक्षक कोल्हापूर आगार संजय शिंदे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अशोक जगताप, वाहतूक निरीक्षक कोल्हापूर आगार श्रीधर वनकोरे, मल्लेश विभूते, दीपक घारगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी आभार मानले.