कसलं हनीमून! नवऱ्याला कोंडून नवरीचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:22 AM2024-09-02T11:22:23+5:302024-09-02T11:22:36+5:30
Kolhapur Crime: लग्न ठरविण्यासाठी दीड लाख दिले, खर्चाला म्हणून मुलीच्या आईला ५० हजार दिले, देवळात साखरपुडा केला, दारात जोरदार लग्न केले. गणपतीपुळे येथे हनिमूनला गेल्यावर लातूरच्या नवरीने दाराची कडी घालून नवऱ्याला डांबले आणि अंगावरील सोन्यासह पळून गेली.
- सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे (जि. कोल्हापूर) : लग्न ठरविण्यासाठी दीड लाख दिले, खर्चाला म्हणून मुलीच्या आईला ५० हजार दिले, देवळात साखरपुडा केला, दारात जोरदार लग्न केले. गणपतीपुळे येथे हनिमूनला गेल्यावर लातूरच्या नवरीने दाराची कडी घालून नवऱ्याला डांबले आणि अंगावरील सोन्यासह पळून गेली.
लातूरच्या मध्यस्थांना नवरी द्या, नाही तर पैसे द्या म्हटल्यावर, तुम्हीच गायब केलेली मुलगी परत आणून द्या, नाही तर तुम्हाला बघून घेतो म्हणून मध्यस्थानेच नवऱ्याला तंबी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. या प्रकाराची नोंद रत्नागिरी पोलिस ठाण्यात झाली आहे
पन्हाळा तालुक्यातील युवकाला नातेवाईक असणाऱ्या एजंटाने लातूरमधील मुलीचा फोटो दाखवला. या मुलीच्या आईला खर्चाला ५० हजार रुपये देण्याच्या अटीवर लग्न जुळविले. त्यानंतर मुलीला गावाकडे आणून लाखो रुपये खर्चून दारात जोरदार लग्न केले. नवदाम्पत्य गणपतीपुळ्याला हनिमूनला गेले. तेथे नवरदेव झोपेत असताना तिने धूम ठोकली.