कोल्हापूर : शासनाने साखर घेऊन करायची काय? सहकारमंत्र्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:41 PM2018-05-18T17:41:04+5:302018-05-18T17:41:04+5:30
साखरेचे दर कोसळत असल्याने शासनाने साखर खरेदी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. मात्र, ही साखर खरेदी करून तिचे काय करायचे, असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असल्याने शासनाने साखर खरेदी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. मात्र, ही साखर खरेदी करून तिचे काय करायचे, असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी देशमुख शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांना विचारले असता ते म्हणाले, शेवटी साखर घेऊन शासन तरी त्या साखरेचे काय करणार आहे. याहीपेक्षा पुढच्यावर्षी परिस्थिती बिकट असल्याचे सूतोवाचही देशमुख यांनी केले.
देशमुख यांना त्यांच्या ‘लोकमंगल’ समूहावर ‘सेबी’ने निर्बंध आणल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कंपनीच्या विस्तारासाठी आम्ही शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते विकताना त्यातील काही तरतुदी आम्हाला माहिती नव्हत्या.
सीएनीही आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या नाहीत आणि आता त्यातूनच हे निर्बंध आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेअर्सची रक्कम परत केली जाईल. अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी शेअर्स गोळा केले आहेत त्या सर्वांनाच ही अडचण आली आहे.