कोल्हापूर : रुग्णालयातून बाहेर पडताच अटक करणार : तानाजी सावंत, लक्षतीर्थ वसाहत खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 06:30 PM2018-02-28T18:30:15+5:302018-02-28T18:30:15+5:30
लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून झालेल्या तलवार हल्ल्यातील दोघे आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक केली जाईल. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली. मंगळवारी झालेल्या खुनी हल्ल्यामध्ये सुनील सर्जेराव पाटील (वय ३०) व केदार भागोजी घुरके (२१) हे जखमी झाले आहेत.
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून झालेल्या तलवार हल्ल्यातील दोघे आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक केली जाईल.
या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली. मंगळवारी झालेल्या खुनी हल्ल्यामध्ये सुनील सर्जेराव पाटील (वय ३०) व केदार भागोजी घुरके (२१) हे जखमी झाले आहेत.
केदार घुरके याने सुनील पाटील याच्याकडून व्यापारासाठी पैसे घेतले होते. ते व्याजासहित परत केले होते. यापूर्वीही पैशांच्या देवघेवीवरून त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी (दि. २७) दोघेही लक्षतीर्थ वसाहतीमधील तळ्यावरील महादेव मंदिराच्या समोर येताच त्यांच्यात पैशांवरून जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोघेही जखमी झाले.
त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक सावंत यांनी या दोघांची बुधवारी रुग्णालयात भेट घेऊन जबाब नोंदविले. त्यानुसार खुनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल केला.
सुनील पाटील याच्या जबाबात ‘संतोष बोडके माझे पैसे द्यायचा आहे,’ असा उल्लेख आल्याने बोडकेची याप्रकरणी चौकशी होणार आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील करत आहेत.