कोल्हापूर टोलमुक्त करणारच

By admin | Published: November 22, 2014 12:28 AM2014-11-22T00:28:44+5:302014-11-22T00:28:58+5:30

चंद्रकांतदादा पाटील : सरकार सकारात्मक; कायदा कुणीही हातात घेऊ नये

Kolhapur will be free toll | कोल्हापूर टोलमुक्त करणारच

कोल्हापूर टोलमुक्त करणारच

Next

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ‘टोल’बाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘कोल्हापूर टोलमुक्त करणारच’, त्यासाठी थोडा वेळ द्यावा, अशी ग्वाही सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, टोल या विषयात सरकारने माघार घेतलेली नाही. चळवळीतून मोठे झालेलो आम्ही कार्यकर्ते आहोत. सायन, पनवेल येथील २००० कोटी रुपये किमतीच्या टोल प्रकल्पातील टोलआकारणी रद्दबाबत सरकारचा विचार सुरू आहे. त्या तुलनेत कोल्हापूरचा प्रकल्पाचा प्रश्न छोटा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन टोल रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या सरकारची
स्थिती थोडी अस्थिर आहे. दररोज सरकारकडून घेतले जात असलेले तातडीचे निर्णय आणि सरकार स्थिर करण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे सरकारची धावपळ होत आहे.
तरीही यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासोबत दोनवेळा बैठक घेऊन यावर काही मार्ग निघतो का? याबाबत चर्चा झाली आहे. परंतु जो प्रश्न गेल्या पाच वर्षांत सुटला नाही. तो एकाच रात्रीत कसा सुटू शकेल ? यासाठी आणखी थोडा कालावधी लागण्याची शक्यता आहे. टोलसह एलबीटीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्ही टोलमुक्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशी आम्ही निश्चित बांधील आहोत.
एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. जीएसटी आल्यावर एलबीटी आणि जकात पूर्ण संपवू. व्यापाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला कर चालेल पण नवीन पर्याय डोक्यावर आणून बसवू नये. व्यापाऱ्यांनीच हा कर व्हॅटवर सरचार्ज आकारण्याचा पर्याय दिला आहे. त्यानुसार हा कर व्हॅटमध्ये जोडता येईल का? याबाबत सरकार विचार करत आहे.
कोल्हापूरमध्ये एलबीटी कमी जमा झाला तर अडचण होईल तसेच त्याला पर्यायही दिला नाही तर तेही चालू शकणार नाही. त्यामुळे ना टोल, ना एलबीटी यामधून सरकार मागे गेलेले नाही. त्याला आम्ही तितकेच बांधील आहोत. (प्रतिनिधी)

टोलप्रश्नी आज बैठक
टोलप्रश्नी उद्या, शनिवारी सकाळी १०.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक होणार आहे.

Web Title: Kolhapur will be free toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.