राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत कोल्हापूरला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:18+5:302021-09-07T04:30:18+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलाट संघटनेच्यावतीने कर्जत (रायगड) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने ...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलाट संघटनेच्यावतीने कर्जत (रायगड) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने १५ सुवर्ण, सात रौप्य व तीन कांस्य अशी २५ पदकांची कमाई करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडूंमध्ये दिव्या पाटील, स्वरूपा सांडुगडे, आदिती पाटील, सोहम घोटणे, वरद शेटे, आर्यन पाटील, वरुण पाटील, आयुष सरवळे, गौरव सरवळे, वेदांत बोटे, अलोक शेटे, श्रेयश शेटे, धनंजय सांडुगडे, श्रेयस बोटे, सुहास पाटील, तर रौप्य पदक विजेत्यांमध्ये श्रावणी बेडगे, करोती कोईगडे, अनुष्का कोईगडे अथर्व वाडकर, श्रीशांत पाटील आदित्य पाटील, विशाल मोरे व कांस्य पदक विजेत्यांमध्ये कुणाल घाटगे, आदित्य पाटील, साहिल बोटे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील, सचिव सुहास पाटील, उपाध्यक्ष विशाल मोरे, पांडुरंग पाटील, संस्थापक संग्राम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : ०६०९२०२१-कोल-पिंच्याक सिलाट
आेळी : कर्जत (रायगड) येथे झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा संघास इंडियन पिंच्याक सिलाट संघटनेचे अध्यक्ष किशोर येवले, मुकेश सोनवणे यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक बहाल करण्यात आला.