अभिनंदनीय! कोल्हापूरच्या शिवाली, आदितीची राज्य महिला क्रिकेट संघात निवड

By सचिन भोसले | Published: October 7, 2022 06:17 PM2022-10-07T18:17:55+5:302022-10-07T18:19:11+5:30

या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, कर्नाटक, दिल्ली, हिमाचलप्रदेश, आसाम, मणीपूर या संघांचा समावेश आहे.

Kolhapur women cricketers Shivali Shinde and Aditi Gaikwad selected in Maharashtra Women's Senior Cricket T20 Team | अभिनंदनीय! कोल्हापूरच्या शिवाली, आदितीची राज्य महिला क्रिकेट संघात निवड

अभिनंदनीय! कोल्हापूरच्या शिवाली, आदितीची राज्य महिला क्रिकेट संघात निवड

Next

कोल्हापूर : सुरत येथे मंगळवार (दि.११) पासून होणाऱ्या राष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे व आदिती गायकवाड यांची महाराष्ट्र महिला वरिष्ठ क्रिकेट टी-२० संघात निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, कर्नाटक, दिल्ली, हिमाचलप्रदेश, आसाम, मणीपूर या संघांचा समावेश आहे.

शिवालीची यापुर्वी बंगळूरूतील १९ वर्षााखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली होती. त्यानंतर सलग ४ वर्षे ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व व कर्णधारपदही भूषविले आहे. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामध्ये तिने २०१३-१४ साली १९ वर्षाखालील पश्चिम विभाग (भारतीय संघ) चे उपकर्णधारपदीही भूषविले. २०१९-२० मध्ये तिने भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक स्पर्धा व महिला आयपीएल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली.

आदीती ही महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघात सलग पाच वर्षे खेळली आहे. बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय १९ वर्षाखालील संघात देखील तिची निवड झाली होती. २३ वर्षाखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. २०१९-२० या कालावधीत तिची २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती.

Web Title: Kolhapur women cricketers Shivali Shinde and Aditi Gaikwad selected in Maharashtra Women's Senior Cricket T20 Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.