कोल्हापूर : प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 05:04 PM2018-01-27T17:04:09+5:302018-01-27T17:25:24+5:30

कोल्हापूर शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये बरबाद करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 Kolhapur: The work of authority started from 1st February: Chandrakant Dada Patil, freedom of expression should not be misused | कोल्हापूर : प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये 

कोल्हापूर : प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये 

Next
ठळक मुद्दे प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटीलअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये प्रमोद पाटील यांचा उपक्रम गौरवास्पद

कोल्हापूर : शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये बरबाद करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शाहू स्टेडियम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा सकाळी ९.१५ वाजता त्यांच्या हस्ते झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. पालकमंत्री पाटील म्हणाले, प्राधिकरणाचे काम हे कसबा बावडा येथील प्रशासकिय इमारत येथील कार्यालयातून सुरु होणार आहे. या प्राधिकरणामुळे शहरा लगतच्या गावांसह उपनगरांचा विकास होईल.

प्रस्तावित हद्दवाढीतील गावांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून एका नियमावलीत ही गावे आल्याने त्यांचा चांगल्या प्रकारे व व्यवस्थित विकास या प्राधिकरणातून होणार आहे. शहरामध्ये अनेक गोष्टी ज्या महापालिकेच्या सध्याच्या उत्पन्नात करता येत नाहीत. त्या

मध्ये उपनगरात एखादे चांगले हॉस्पिटल या प्राधिकरणाच्या माध्यमातून करता येईल. या ठिकाणी चांगले व सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा प्राधिकरणचा मनोदय आहे. त्याचबरोबर एक आॅडीटोरियमही उभारले जाईल. अशा गोष्टींच्या सुविधांमुळे उपनगरातील लोकांना भवानी मंडपात यावे लागणार नाही.

ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून तयार झालेल्या भारतीय राज्य घटनेमुळे पुरुष व स्त्रियांना एकाच मताचा अधिकार मिळून समानता आली. त्याचबरोबर प्रत्येकाला स्वत:चे हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. आपल्या हक्कांसाठी आपण जितके जागरुक असतो. तसे दुसऱ्यांच्या हक्कासाठीही जागरुक असले पाहीजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे प्र्रत्येकाला दिले आहे.त्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये आपण बरबाद तर करत नाही ना याचेही भान प्रत्येकाने ठेवावे.

३१ मार्चपर्यंत शिल्लक वाड्यावस्त्यांवर वीज मिळणार

जिल्ह्यातील एकही वाडी वस्ती वीजेपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तीन ते चार वाड्या सोडल्या तर सर्वत्र वीज पोहोचली आहे. या ठिकाणी वीज द्यावी, ती शक्य नसल्यास सोलरच्या माध्यमातून वीज पुरवावी, ३१ मार्चपर्यंत शिल्लक राहील्या वाड्यांवर कोणत्याही परिस्थितीत वीज द्यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

प्रमोद पाटील यांचा उपक्रम गौरवास्पद

जिल्ह्यातील धनगरवाड्यातील मुलांना कोल्हापूर व कोल्हापूरची वैशिष्टये दाखविण्यासाठी सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम गौरवास्पद आहे. विकासापासून मागे राहीलेल्या समाजाला विकासाची तोंड ओळख करुन देणे आवश्यक असून ते पाटील यांच्या प्रयत्नातून होत आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title:  Kolhapur: The work of authority started from 1st February: Chandrakant Dada Patil, freedom of expression should not be misused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.