रिया चक्रवर्तीच्या फोन साधर्म्यामुळे कोल्हापूरच्या तरुणाला मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 06:58 PM2020-08-11T18:58:26+5:302020-08-11T18:59:32+5:30

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्याप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. एका वृत्तवाहिनीने तिने कोणत्या मोबाईलवरून कॉल केले होते तो नंबर जाहीर केला परंतू त्याच नंबरसारखा व फक्त शेवटचा एकच अंक बदल असलेल्या गारगोटीतील तरुणाला मात्र गेली पंधरा दिवस विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. वैतागून त्यांने हे फोनचे कार्डचे बंद करून टाकले.

Kolhapur youth annoyed by Riya Chakraborty's phone analogy | रिया चक्रवर्तीच्या फोन साधर्म्यामुळे कोल्हापूरच्या तरुणाला मनस्ताप

रिया चक्रवर्तीच्या फोन साधर्म्यामुळे कोल्हापूरच्या तरुणाला मनस्ताप

Next
ठळक मुद्देरिया चक्रवर्तीच्या फोन साधर्म्यामुळे कोल्हापूरच्या तरुणाला मनस्तापसतत कॉल आणि व्हाट्सआप मेसेज

कोल्हापूर : अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्याप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. एका वृत्तवाहिनीने तिने कोणत्या मोबाईलवरून कॉल केले होते तो नंबर जाहीर केला परंतू त्याच नंबरसारखा व फक्त शेवटचा एकच अंक बदल असलेल्या गारगोटीतील तरुणाला मात्र गेली पंधरा दिवस विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. वैतागून त्यांने हे फोनचे कार्डचे बंद करून टाकले.

सुशांतसिहच्या आत्महत्येनंतर अनेकांची चौकशी सुरू झाली. त्यात रिया चक्रवर्ती हिची मुख्यत: चौकशी होत आहे. तिचे कॉल रेकॉर्डिंग काढले गेले. काही दिवसांपूर्वी टीव्ही स्क्रिनवर रियाचे कॉल कनेक्शन म्हणून एक नंबर दाखवला. रियाच्या नंबरशी साध्यार्म्य असलेला केवळ एक शेवटचा अंक बदल असलेला नंबर गारगोटीतील सागर सुर्वे याचा आहे. त्यामुळे सुर्वे यांना सतत कॉल आणि व्हाट्सआप मेसेज येत होते.

रियाशी बोलायचे आहे. तुझे फोटो पाठव. काही अश्लील मेसेजही आले. सुरुवातीला त्याला काही समजले नाही पण नंतर हा उलगडा झाला. त्यांने नंबर ब्लॉक केला पण व्हाट्सआपला मेसेज, व्हिडीओ कॉल येऊ लागले. शेवटी सागरने हा नंबरच सोमवारी कायमचा बंद करून टाकला.

Web Title: Kolhapur youth annoyed by Riya Chakraborty's phone analogy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.