कोल्हापूर : युवा संसदेमध्ये शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ठरले उत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:08 AM2018-09-27T11:08:48+5:302018-09-27T11:14:15+5:30

चौदाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा शिवाजी विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली. या संघाला विभागीय स्तरावर अव्वल दर्जाचीकामगिरी बजावल्याबद्दल

Kolhapur: In the Yuva Parliament, eight students of Shivaji University were the best | कोल्हापूर : युवा संसदेमध्ये शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ठरले उत्कृष्ट

कोल्हापूर : युवा संसदेमध्ये शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ठरले उत्कृष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्यांदाच यश; नवी दिल्लीत पारितोषिक वितरणस्पर्धेत देशभरातून एकूण ७४ संघ सहभागी झाले.

कोल्हापूर : चौदाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा शिवाजी विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली. या संघाला विभागीय स्तरावर अव्वल दर्जाचीकामगिरी बजावल्याबद्दल आणि या संघातील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स प्राईझ विनर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्लीतील संसद भवनाच्या बालयोगी सभागृहात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते झाला. विभागीय सांघिक पारितोषिकासह संघातील निकिता पिसे, अभिजित ताम्हणकर, शैलेश चिले, श्रेयश मोहिते, विनायक साळुंखे, गौरी काटे, हेरंब सावंत, आकांक्षा पाटील या विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्स् प्राईस विनर हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत देशभरातून एकूण ७४ संघ सहभागी झाले.

विद्यापीठाचा लौकिक उंचावला
या संघाने चषकासह कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करून संघातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचा लौकिक उंचावला आहे. या यशाचा विद्यार्थ्यांना भावी जीवनात निश्चितपणे सकारात्मक लाभ होईल. सार्वजनिक जीवनात वावरतानाही देशाचा लौकिक वाढेल, असे योगदान त्यांनी द्यावे.

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेतील विभागीय स्तरावरील विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ. प्रल्हाद माने आणि विद्यार्थ्यांनी सुपूर्द केला.
 

Web Title: Kolhapur: In the Yuva Parliament, eight students of Shivaji University were the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.